(म्हणे) ‘अजमेर ९२’ चित्रपट प्रदर्शनापूर्वी आम्हाला दाखवा !’ – अजमेर शरीफ दर्गा कमिटी

  • अजमेर शरीफ दर्गा कमिटीची मागणी !

  • चित्रपटातून अजमेर दर्ग्याचा अवमान करण्याचा प्रयत्न झाल्यास कायदेशीर कारवाईची चेतावणी !

अजमेर (राजस्थान) – येथे वर्ष १९९२ मध्ये २५० हून अधिक हिंदु असलेल्या महाविद्यालयीन तरुणींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेवर आधारित आगामी हिंदी चित्रपट ‘अजमेर ९२’ला मुसलमान संघटनांकडून विरोध होऊ लागला आहे. अजमेर शरीफ दर्गा कमिटीने चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी तो त्यांना दाखवण्याची मागणी केली आहे.

१. अजमेर शरीफ दर्गा कमिटीचे म्हणणे आहे की, या चित्रपटातून एका विशेष समाजाला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जर या चित्रपटातून अजमेर शरीफ दर्गा आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या प्रतिमेला हानी पोचवण्याचा प्रयत्न झाला असेल, तर या चित्रपटाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू !

२. इंडिया मुस्लिम फाऊंडेशनचे प्रमुख शोएब जमाई यांनी ट्वीट करून म्हटले आहे की,  अजमेर दर्गा कमिटीचे सय्यद गुलाम किब्रिया आणि सरचिटणीस सरवर चिश्ती, तसेच सेवेकर्‍यांची कमिटी यांच्याशी चर्चा केल्यानंतर अधिकृत घोषणा करतो की, जर ‘अजमेर ९२’ चित्रपट अजमेर शहरात झालेल्या घटनेपर्यंतच सीमित असेल, तर आम्हाला कोणतीही समस्या नाही; मात्र जर षड्यंत्राद्वारे अजमेर शरीफ दर्गा आणि ख्वाजा मोइनुद्दीन चिश्ती यांच्या प्रतिमेला हानी पोचवण्याचा प्रयत्न झाला, तर चित्रपट निर्मात्यांच्या विरोधात कारवाई करू. संपूर्ण देशात शांततापूर्ण विरोध केला जाईल.

३. अजमेर दर्ग्याच्या सेवेकर्‍यांची संस्था ‘अंजुमन सैयद जागदान’चे सरचिटणीस सैयद सरवर चिश्ती यांनी फेसबुकवर एक व्हिडिओ शेअर करून म्हटले की, ‘अजमेर ९२’ हा एका राजकीय धोरणाचा भाग आहे. कर्नाटकमधील निवडणुकीच्या वेळी ‘द केरल स्टोरी’ चित्रपट आला होता. आता राजस्थानमध्ये निवडणुका असल्याने ‘अजमेर ९२’ हा चित्रपट बनवण्यात आला आहे. या चित्रपटावर बंदी घातली पाहिजे; कारण हा चित्रपट एका समाजाला लक्ष्य करत आहे.

४. यापूर्वी ‘जमियत उलेमा-ए-हिंद’चे प्रमुख मौलाना (इस्लामचे अभ्यासक) महमूद मदनी यांनीही ‘अजमेर ९२’ हा चित्रपट अजमेर शरीफ दर्ग्याला अपकीर्त करण्याच्या उद्देशाने बनवण्यात आल्याचा दावा केला होता. मदनी यांनी म्हटले होते की, वर्तमानात समाजात फूट पाडण्याची कारणे शोधली जात आहेत. हा चित्रपट समाजामध्ये फूट पाडणारा आहे.

संपादकीय भूमिका 

देशात धर्मांध मुसलमानांनी केलेल्या हिंदूंवरील अत्याचारांच्या घटना आता जगासमोर मांडण्यात येऊ लागल्यावर त्यांना मिरच्या झोंबणे अपेक्षित आहे आणि त्यातूनच ते अशा प्रकारची मागणी करत आहेत !