राज्‍यातील २८८ मतदारसंघांत भाजपकडून निवडणूक प्रमुखांची घोषणा !

मुंबई – वर्ष २०२४ मध्‍ये होणार्‍या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यातील २८८ मतदारसंघांमध्‍ये निवडणूक प्रमुखांची नियुक्‍ती भाजपकडून करण्‍यात आली आहे. या सर्व मतदारसंघांत २८८ निवडणूक प्रमुख पूर्णवेळ काम करणार आहेत, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. राज्‍यात २०० आमदार निवडून आणण्‍यासाठी भाजप प्रयत्न करणार असल्‍याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.