|
(‘स्टेटस’ म्हणजे इतरांना पहाता येण्यासाठी स्वतःच्या भ्रमणभाषवर ठेवलेले चित्र किंवा मजकूर)
कोल्हापूर- छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अवमानाच्या निषेधार्थ शहरात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी पुकारलेल्या बंदला प्रतिसाद देत कोल्हापूर शहरात ७ जून या दिवशी कडकडीत बंद पाळण्यात आला. छत्रपतींच्या राज्याभिषेकदिनाच्या दिवशीच क्रूरकर्मा औरंगजेब आणि टिपू सुलतान यांचे ‘स्टेटस’ ठेवून छत्रपतींचा अवमान केल्याच्या निषेधार्थ छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी ९ वाजल्यापासूनच विविध हिंदुत्वनिष्ठ पक्ष, संघटना आणि सामान्य हिंदूही एकत्र येण्यास प्रारंभ झाला. त्यानंतर हिंदुत्वनिष्ठ आणि पोलीस यांच्यात बाचाबाची होऊन धक्काबुक्की करण्यात आली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. ६ जूनला रात्री जमावावर आक्रमण झाल्यावर शहरात काही ठिकाणी दगडफेक करण्यात आली. त्या प्रकरणी काही हिंदूंना पोलिसांनी रात्री अटक केली. ‘या हिंदूंना तात्काळ सोडण्यात यावे. जोपर्यंत हिंदु कार्यकर्त्यांना सोडत नाहीत’, तोपर्यंत आम्ही इथून हालणार नाही’, अशी हिंदुत्वनिष्ठांची भूमिका होती. नंतर पोलिसांनी लाठीमार केला.
सौजन्य: Jai Maharashtra News
१. ६ जून या दिवशी झालेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी १९ जूनपर्यंत जमावबंदीचा आदेश घोषित केला. हा आदेश झुगारून सहस्रोंच्या संख्येने हिंदु तरुण छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक येथे एकत्र आले.
२. त्यातच पोलिसांनी जमावावर लाठीमार केल्यामुळे महापालिका चौक आणि शिवाजी चौक येथे प्रचंड धावपळ आणि पळापळ झाली. जमाव सैरभर झाल्याने पोलीस आणि राज्य राखीव दलाचे पोलीस यांनी दिसेल त्याला मारण्यास प्रारंभ केल्याने प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
३. या वेळी काही पत्रकारांनाही लाठीमार करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या लाठीमारात काही हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची डोकी फुटली आणि ते रक्तबंबाळही झाले. पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या.
४. या वेळी दगडफेकही झाल्याचे समजते. पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांवर काठ्या उगारल्याने जमावाने महापालिका चौकातील रिक्शा फोडली, तसेच काही दुकानेही फोडण्यात आली.
५. मोठ्या प्रमाणात गदारोळ झाल्याने शेकडो चपलांचा खच छत्रपती शिवाजी महाराज चौकात पसरला होता.
संपादकीय भूमिकाकोल्हापूर येथील पोलिसांची मोगलाई ! हा जमाव जर मुसलमानांचा असता, तर पोलीस लाठीमार करण्यास धजावले असते का ? हिंदूंवर मर्दुमकी गाजवणारे पोलीस धर्मांधांसमोर नांगी टाकतात, हा पोलिसांचा इतिहास आहे ! |
शहरात घडलेल्या अन्य घडामोडी
१. सकाळी १० नंतर कोणतीही अप्रिय घटना घडू नये म्हणून शहरातील बससेवा बंद करण्यात आली होती.
२. शहरात जवळपास प्रत्येक चौकात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
३. या गोंधळामुळे श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांवरही परिणाम झाला.
४. आक्षेपार्ह स्टेटस’ ठेवल्याच्या प्रकरणी ५ जणांना कह्यात घेतले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी पत्रकारांना दिली आहे.
५. शहरातील सर्व भ्रमणभाष आस्थापनांना जालस्थळ (इंटरनेट) दुपारनंतर बंद करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.
आंदोलनाच्या प्रसंगी जमलेल्या हिंदूंनी ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, ‘जय भवानी-जय शिवराय’, ‘एकदाच दिसणार-भगवा दिसणार’ अशा घोषणा दिल्या. ‘तो प्रत्येक आवाज चिरडला जाईल, जो छत्रपतींच्या विरोधात उठेल’, असेही फलक फडकावण्यात आले होते. |
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या येथे जेव्हा हिंदुत्वनिष्ठ एकत्र आले, तेव्हा त्यांतील अनेकांकडे ‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाची भीत्तीपत्रके होती. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात होणार्या विविध घटनांमुळे हिंदु कार्यकर्ते प्रचंड संतप्त होते. |
आंदोलनाच्या प्रसंगी महनीय व्यक्तींच्या प्रतिक्रिया
कायदा मोडणार्यांना सोडणार नाही ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
राज्यात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आवश्यक आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम गृहविभागाचे असल्याने मी संबंधित अधिकार्यांशी वैयक्तिरित्या बोललो आहे. कुणीही कायदा हातात घेऊन नये. सगळ्यांनी सहकार्य करावे, कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी गृहविभाग घेत आहे. स्वत: गृहमंत्र्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घातले आहे. कायदा मोडणार्यांना सोडणार नाही.
सौजन्य: TV9 Marath
औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री
या संदर्भात पत्रकारांशी बोलतांना उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री म्हणाले, ‘‘महाराष्ट्रात जर औरंगजेबाचे उदात्तीकरण कुणी करत असेल, तर कुणालाही निश्चित संताप येईल. आम्ही औरंगजेबाचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही. माझी सर्वांना विनंती आहे की, कुणीही कायदा हातात घेऊ नये. कोल्हापुरात झालेला प्रकार हा कुणी घडवला ?, हे शोधावे लागेल.’’
🕝2.30pm | 07-06-2023 📍Nagpur | दु. २.३० वा. | ०७-०६-२०२३📍नागपूर
LIVE | Media interaction https://t.co/CAhkEqU4MI— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 7, 2023
हिंदूंनी जागे होण्याची वेळ आली आहे ! – शोभाताई शेलार, अध्यक्ष, अखिल भारत हिंदु महासभा
आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे मावळे असून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करणार नाही. सध्याच्या काळात हिंदु माता-भगिनी यांच्यावर अत्याचार होत असतांना आम्ही आता शांत बसू शकत नाही. हिंदूंनीही आता जागे होण्याची वेळ आली आहे. –
छत्रपती शिवरायांचा अवमान करण्यामागील सूत्रधार शोधणे आवश्यक ! – श्री. धनंजय महाडिक, खासदार, भाजप
औरंगजेब आणि टीपू सुलतान तुमचे आदर्श असू शकत नाहीत. ‘हे कोण करत आहे आणि याच्या मागे कोण आहे ?’, याचा शोध घेण्याची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणार्यांना केवळ अटक करून चालणार नाही, तर ‘त्यांचे बोलावते धनी कोण आहेत ?’, याचा शोध घेतला पाहिजे. ‘अवमान प्रकरणी अटक करण्यात आलेले कार्यकर्ते कुणाचे आहेत ?’, याचा शोध घेतला पाहिजे.
तरुणांनी डोकी भडकावणार्यांच्या हातातील बाहुले बनू नये ! – राजू शेट्टी, माजी खासदार, स्वाभिमानी शेतकरी संघटना
कोल्हापूरवर शाहू महाराजांच्या विचारांचा पगडा आहे. त्यामुळे झालेल्या घटना या आपल्या सगळ्यांना अंतर्मुख करणार्या आहेत. माझी तरुण मित्रांना विनंती आहे की, त्यांनी डोकी भडकावणार्यांच्या हातातील बाहुले बनू नये. अशी दंगलीला केवळ गोरगरिबांची पोर बळी पडतात. जे दंगली घडवतात त्यांच्या घरातील मुले कधीच यात नसतात.