बांधकाम व्‍यावसायिकावर गुन्‍हा नोंदवण्‍यास टाळणार्‍या पोलीस निरीक्षकाच्‍या चौकशीचे आदेश !

प्रतीकात्मक छायाचित्र

पुणे – सदनिका खरेदी प्रकरणात फसवणूक केल्‍याप्रकरणी बांधकाम व्‍यावसायिकाच्‍या विरोधात गुन्‍हा नोंद करण्‍यास टाळाटाळ करणारे सहकारनगर पोलीस ठाण्‍याचे तात्‍कालीन पोलीस निरीक्षक आणि कर्मचारी यांची चौकशी करण्‍याचे आदेश दिले आहेत. शोभना डेंगळे यांनी सहकारनगर पोलीस ठाण्‍याचे तात्‍कालीन पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांच्‍या विरोधात पोलीस प्राधिकरणामध्‍ये तक्रार दिली होती. प्राधिकरणाने दोन्‍ही बाजूंचा युक्‍तीवाद ऐकून सविस्‍तर अन्‍वेषण करण्‍याचे आदेश दिले आहेत, तसेच या आदेशाची प्रत गृह विभागाच्‍या अतिरिक्‍त सचिव आणि पोलीस आयुक्‍त यांना द्यावी असेही नमूद केले आहे.

संपादकीय भूमिका

अशा कामचुकार अधिकारी आणि कर्मचारी यांना बडतर्फ करायला हवे !