(म्हणे) ‘अजमेर ९२’ चित्रपटावर प्रदर्शनापूर्वीच बंदी घाला ! – ‘जमियत उलमा-ए-हिंद’

‘जमियत उलमा-ए-हिंद’ संघटनेची मागणी

महमूद मदनी

नवी देहली – मुसलमानांच्या ‘जमियत उलमा-ए-हिंद’ या संघटनेने ‘अजमेर-९२’ या आगामी हिंदी चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली. हा चित्रपट अद्याप प्रदर्शित व्हायचा आहे. या चित्रपटामध्ये वर्ष १९९२ मध्ये अजमेर येथे महाविद्यालयीद हिंदु विद्यार्थिनींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याची घटना मांडण्यात आली आहे. २५० हून अधिक हिंदु विद्यार्थिनींचे यात शोषण करण्यात आले होते. शोषण करणार्‍यांमध्ये अजमेर दर्ग्याच्या सेवकांचा समावेश होता. यांतील अनेकांना अद्याप शिक्षाही झालेली नाही. असे असतांना आता ‘जमियत उलमा-ए-हिंद’न चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.

जमियतचे अध्यक्ष मौलाना (मुसलमान जाणकार) महमूद मदनी यांनी म्हटले की, अजमेर शरीफ दर्ग्याची अपकीर्ती करण्यासाठी बनवण्यात येणार्‍या या चित्रपटावर त्वरित बंदी घातली पाहिजे. गुन्हेगारी घटनांना धर्माशी जोडण्याऐवजी गुन्ह्यांच्या विरोधात संघटित होऊन कारवाई करण्याची आवश्यकता आहे. असे चित्रपट समाजामध्ये फूट पाडू शकतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्य एक वरदान असून ते कोणत्याही लोकशाहीची शक्ती आहे; मात्र त्याच्या आडून देश तोडणार्‍या विचारांना प्रोत्साहन दिले जाऊ शकत नाही. अजमेर दर्गा हिंदु आणि मुसलमान यांच्या एकतेचे जिवंत उदाहरण आहे. ज्या लोकांनी या दर्ग्याचा अवमान करण्याचा प्रयत्न केला, ते स्वतः अपमानित झाले आहेत.

संपादकीय भूमिका 

पूर्वी हिंदु-मुसलमान बंधूभावाच्या खोट्या गोष्टी सांगणारे चित्रपट प्रदर्शित करून हिंदूंना भ्रमात ठेवून त्यांचा आत्मघात करण्यात येत होता. आता हिंदूंना सत्य इतिहास सांगून वस्तूस्थिती मांडणारे चित्रपट प्रदर्शित होऊ लागल्यावर मुसलमान संघटनांना आणि त्यांच्या नेत्यांना मिरच्या झोंबणारच ! त्यातूनच आता ‘द कश्मीर फाइल्स’, ‘द केरल स्टोरी’ आणि आता ‘अजमेर ९२’ या चित्रपटांवर बंदीची मागणी होऊ लागली आहे, हे लक्षात घ्या !