राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांची अभिनंदनीय कृती !
नवी देहली – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी रेल्वेने मध्यप्रदेशातून देहलीकडे जात असतांना एका अल्पवयीन मुलीची तस्करी करणार्या जोडप्याला पोलिसांच्या स्वाधीन केले.
चलती ट्रेन में दलालों को पहचानकर NCPCR अध्यक्ष ने करवाया गिरफ्तार, नाबालिग लड़की की जान बची: पूरी घटना Video में कैद#NCPCR #ChildTraffickinghttps://t.co/dFQhIbzhT1
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 1, 2023
३० मेच्या रात्री कानूनगो हे कटनीहून देहलीला जात असतांना त्यांना एका जोडप्यावर संशय आला. त्यांच्यासमवेत १५-१६ वर्षांची एक मुलगी होती. ते जोडपे त्या मुलीचे आई-वडील असल्याचे वाटत नव्हते. त्यांचे हावभावही विचित्र वाटल्याने कानूनगो यांनी त्यांची चौकशी केली. त्यांची कागदपत्रे पडताळली. तेव्हा त्यांचा संशय बरोबर निघाला. ते मुलीची तस्करी करणार होते. कानूनगो यांनी त्वरित पोलिसांशी संपर्क करून सागर रेल्वे स्थानकावर त्या दोघांना पोलिसांच्या स्वाधीन केले, तर मुलीला बाल कल्याण समितीकडे सुपुर्द केले. या संपूर्ण प्रकरणाचे चित्रीकरणही करण्यात आले आहे.
मुलगी छत्तीसगडच्या बिलासपूर येथील असून तिचे समुपदेशन केले जात आहे. तिचा सामाजिक अहवाल (सोशल रिपोर्ट) बनवला जात आहे. या अहवालाच्या अंतर्गत कुटुंबियांनी मुलीला तस्करांच्या हाती सोपवण्यामागील घरच्या परिस्थितीचा अभ्यास केला जाणार आहे. जर एकूण परिस्थिती पहाता मुलीला घरी पाठवल्यावर तिला पुन्हा तस्करांकडे पाठवले जाण्याची शक्यता असेल, तर तिला घरी पाठवले जाणार नाही.