१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीतील देवघरातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राची पूजा करतांना झोप अनावर होणे
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या खोलीतील देवघरात प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र आहे. त्याची पूजा करतांना मला अनावर झोप येते. माझी अशी अवस्था २ – ३ मिनिटे असते. मला असे ४ – ५ दिवसांपासून होत होते. मी छायाचित्र पुसून जागेवर ठेवल्यावर माझी झोप हळूहळू न्यून होते. ‘माझी झोप पूर्ण न झाल्याने असे होत असेल’, असे मला आरंभी वाटले. त्यानंतर मी २ – ३ दिवस निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आले, ‘माझी ६ – ७ घंटे झोप होऊनही मला असाच त्रास होत आहे.’
२. आरंभी पूजा करतांना त्रास न होणे; मात्र काही दिवसांनंतर प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पुसण्यासाठी हातात घेतल्यावर नकारात्मक विचार येऊन झोप अनावर होणे
मी पूजेची सेवा करू लागल्यावर आरंभी मला काहीही त्रास होत नव्हता; मात्र काही दिवसांनंतर मी प.पू. भक्तराज महाराज यांचे छायाचित्र पुसण्यासाठी हातात घेतल्यावर मला झोप अनावर होऊ लागली. तेव्हा माझ्या मनात ‘पूजा करायला नको. माझ्याकडून आता होत नाही. मी दमले आहे’, असे विचार आले; मात्र छायाचित्र पुसून पुन्हा जागेवर ठेवल्यावर माझ्या मनातील विचार उणावले आणि माझी झोपही गेली.
३. मी पूजा करतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले बोलल्यावर माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार आणि झोप नाहिशी होते. तेव्हा ‘देवाचे माझ्यावर किती लक्ष आहे !’, या विचाराने माझी भावजागृती होते.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या खोलीत असलेल्या प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्रातील चैतन्याची अनुभूती त्यांच्या कृपेने मला माझी पात्रता नसतांनाही घेता आली’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’
– कु. प्रांजली नारायण शिरोडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी या संदर्भात सांगितलेली सूत्रे !
‘मी या संदर्भात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सांगितल्यावर ते मला म्हणाले, ‘‘अनिष्ट शक्ती तुला पूजा करू देत नाही; म्हणून तुझ्या मनात नकारात्मक विचार येतात. तुला प.पू. भक्तराज यांच्या छायाचित्रातील चैतन्य सहन होत नाही. पूर्वीपेक्षा आता तुझी साधना चांगली होत आहे. तुला सूक्ष्मातील कळत आहे; म्हणून तुला हा त्रास होत आहे.’’
मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना या संदर्भात सांगितल्यावर त्यांनीही असेच सांगितले. त्यांनी मला पूजा करण्यापूर्वी प्रार्थना आणि भावजागृतीचा प्रयोग करायला सांगितला.’
– कु. प्रांजली नारायण शिरोडकर
|