जैसलमेर (राजस्थान) येथे पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता प्रशासन त्यांचे पुनर्वसन करणार !

पाकिस्तानी निर्वासित हिंदूची घरे पाडल्यानंतर आता त्यांचे पुनर्वसन

जैसलमेर (राजस्थान) – येथील अमर सागर भागात पाकिस्तानी निर्वासित हिंदूंची ५० घरे प्रशासनाने अवैध असल्याचे सांगत पाडण्यात आल्यानंतर देशभरातून त्यावर टीका केली जात आहे.

 (सौजन्य : TIMES NOW Navbharat) 

यामुळे आता जिल्हाधिकारी टिना डाबी या हिंदूंचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न करत असल्याचे वृत्त प्रसारित होत आहे. टिना डाबी यांच्या आदेशानंतर या हिंदूंची घरे पाडण्यात आली होती.

घरांवर कारवाई करण्यात आल्यानंतर विस्थापित झालेल्या निर्वासित हिंदूंच्या खाण्यापिण्यासी सोय जिल्हाधिकारी टिना डाबी यांच्याकडून करण्यात आली. तसेच त्यांच्या रहाण्याचीही पर्यायी व्यवस्था करण्यात आली.

या कारवाई विषयी पत्रकार स्वाती गोयल शर्मा यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून दावा केला आहे की,

या निर्वासित हिंदूंची घरे बुलडोझरद्वारे पाडण्यासह तेथील एका झोपडीला आग लावण्यात आली. त्यांच्या व्हिडिओमध्ये एक झोपडी दिसत असून त्याला आग लागल्याचे दिसत आहे. आगीमुळे महिला आणि मुले घाबरली असल्याचेही यात दिसून येत आहे.

संपादकीय भूमिका

देशभरातून झालेल्या विरोधामुळेच प्रशासनाला त्यांचे पुनर्वसन करणे भाग पडले आहे, हे लक्षात घ्या ! हिंदूंवर मग ते भारतातील असोत कि पाकिस्तानातून आलेले असोत, त्यांच्यावर कारवाई करण्याचे प्रशासनाचे धाडस होणार नाही, असे संघटन हिंदूंनी निर्माण करण्याची आवश्यकता आहे !