दक्षिण चीन सागरात चीन आणि फिलीपीन्स यांच्यात वाढला तणाव
वॉशिंग्टन (अमेरिका) – दक्षिण चीन सागरात चीन आणि फिलीपीन्स यांच्यात तणाव वाढला असून अमेरिकेने यासंबंधी चीनला तंबी देत म्हटले आहे की, चीनने चिथावणीखोर आणि असुरक्षित कृत्ये करू नयेत. ‘फिलीपीन्स कोस्ट गार्ड’ची एक नौका दक्षिण चीन सागरातील स्प्रेटली द्वीपाजवळून जात असतांना समोरून येणारे चीनचे जहाज त्याला धडकण्याच्या हेतूने येत होते, असा आरोप फिलीपीन्सने केला आहे. दुसरीकडे चीनने फिलीपीन्सवरच चिथावणीखोर कृत्य केल्याचा प्रत्यारोप केला आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चीनला विरोध दर्शवला.
अमेरिका ने चीन को दी सख्त चेतावनी, दक्षिण चीन सागर में बंद करे ‘भड़काऊ’ हरकतें, नहीं तो हमले को हो जाए तैयार#uschina #IndiaTVhttps://t.co/pfpQmXZCI4
— India TV (@indiatvnews) April 30, 2023
१. फिलीपीन्सचे म्हणणे आहे की, त्याची नौका सागरी क्षेत्रात पहारा देण्याचे काम करत होती आणि ही कोणत्याही पद्धतीने चिथावणीखोर कारवाई नाही.
२. अमेरिकेच्या गृह विभागाचे प्रवक्ते मैथ्यू मिलर यांनी या घटनेवर म्हटले की, चीन अन्य देशांना त्रास आणि भीती दाखवण्याचे ही घटना उदाहरण आहे.
३. अमेरिका आणि चीन यांच्यात गेल्या काही कालावधीपासून तणावाचे संबंध आहेत. त्यामुळे अमेरिका आता आशियातील अन्य देशांना जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे.
४. संपूर्ण दक्षिण चीन सागरावर चीन स्वत:चा अधिकार असल्याचे सांगतो; परंतु अन्य देशही सागरावर त्यांचा दावा करतात. फिलीपीन्सही त्यांच्यातील एक आहे.
५. फिलीपीन्सचे राष्ट्रपती लवकरच अमेरिकेच्या दौर्यावर जाणार आहेत.
६. अमेरिकेने फिलीपीन्समध्ये स्प्रेटली द्वीपाजवळ चार सैन्य तळ उभारली आहेत. तसेच आधीपासून उभारण्यात आलेल्या ५ तळांवर अमेरिकेचे सैनिक तैनात आहेत. यामुळे चीन संतापला आहे.
संपादकीय भूमिकासकृतदर्शनी फिलीपीन्सची बाजू घेण्याच्या आविर्भावात असलेली धूर्त अमेरिका खरेतर स्वत:चे हित कसे साध्य होईल, हेच पहाते, हे जगजाहीर आहे. अफगाणिस्तान हे त्याचे ताजे उदाहरण ! |