‘रुग्णालयात रुग्णांचे विविध कारणांनी मृत्यू होतात, उदा. अपघातग्रस्त, दीर्घकाळ रुग्णाईत असलेले रुग्ण, अकाली मृत्यू झालेले; तसेच लहान मुले इत्यादी. मृत्यूनंतर प्रत्येकाला लगेच पुढील गती मिळतेच, असे नाही. त्यांपैकी अतृप्त लिंगदेह किंवा वाईट लिंगदेह त्या रुग्णालयातील आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी, उपचारांसाठी आलेले रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक इत्यादींना त्रास देऊ शकतात. रुग्णालयात विविध व्याधींनी त्रस्त असलेल्या रुग्णांमुळे सर्व जण तेथील वातावरणातील अस्वस्थता आणि तणाव अनुभवत असतात.
‘वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी ‘भगवंताचे नामस्मरण करणे’, हा सर्वाधिक प्रभावी उपाय आहे’, असे सनातन धर्मात आणि अनेक संतांनी सांगितलेले आहे. त्यामुळे आधुनिक वैद्य, परिचारिका, स्वच्छता करणारे कर्मचारी आणि रुग्णांचे नातेवाईक यांनी रुग्णालयात असतांना अधिकाधिक नामजप करावा. त्याचा लाभ उपचारांसाठी आलेल्या रुग्णांनाही आपोआप होईल. रुग्णालयातील इतरांनी रुग्णांनाही नामजप करण्याची आठवण करून द्यावी. नामस्मरणाने मनोबल वाढते, मनःशांती मिळते आणि जीवन आनंदी होण्यास साहाय्य होते.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (१०.२.२०२३)
|