पाकिस्तानमध्ये ईशनिंदेच्या आरोपाखाली अटकेत असलेल्या चिनी नागरिकाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

प्रतिकात्मक छायाचित्र

इस्लामाबाद – पाकिस्तानमध्ये ईशनिंदा केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या चिनी नागरिकाला न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यावर प्रतिक्रिया व्यक्त करतांना चीनने ‘याविषयीच्या अहवालाची पडताळणी करत आहोत’, असे म्हटले आहे.

पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतात १६ एप्रिल या दिवशी तियान नावाच्या चिनी नागरिकाला अटक करण्यात आली होती. येथील जलविद्युत प्रकल्पात काम करणार्‍या या चिनी अभियंत्याने ईशनिंदा केली होती. यानंतर त्यांच्या चालकाने त्यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली होती. यासह प्रकल्पावर काम करणार्‍या शेकडो कामगारांनी आंदोलन करत त्यांच्या अटकेची मागणी केली होती. पाकिस्तानमधील ईशनिंदा कायद्याच्या अंतर्गत या गुन्हासाठी फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.

संपादकीय भूमिका

  • अन्य देशातील नागरिकांनी स्वतःच्या धर्मश्रद्धेचा अवमान केल्यावर पाकमध्ये थेट अटक होते, तर भारतात ‘अ‍ॅमेझॉन’सारखी अनेक विदेशी आस्थापने हिंदूंच्या देवतांची सर्रास टिंगलटवाळी करूनही त्यांच्याविरुद्ध काहीही कारवाई होत नाही ! ही स्थिती हिंदूंना लज्जास्पद !