साधकांना आधार देणारे कै. मोहन बेडेकर !

कै. मोहन बेडेकर

१. सौ. वैभवी पाध्‍ये, रत्नागिरी

१ अ. ‘बेडेकरकाका मितभाषी होते.

१ आ. आधार देणे : ते मी केलेल्‍या सेवेतील चुका लिहून ठेवायचे आणि मी त्‍यांच्‍याकडे गेल्‍यावर चुका सांगायचे. ते ‘मी चुका सुधारून घेतो’, असे म्‍हणून मला धीर द्यायचे. त्‍यामुळे मला त्‍यांचा आधार वाटायचा.’

२. श्री. अनिल जठार, पुणे

अ. ‘काकांकडून प्रेमभाव, इतरांना कधीही साहाय्‍य करण्‍याची सिद्धता, त्‍याग इत्‍यादी गुण शिकण्‍यासारखे होते.

आ. त्‍यांचे निधन होण्‍याच्‍या आदल्‍या रात्रीपर्यंत ते सेवारत होते. यातून ‘काका गुरुचरणांजवळ होते’, असे मला जाणवले.’

३. श्री. हनुमंत करंबेळकर (आध्‍यात्मिक पातळी ६५ टक्‍के, वय ७२ वर्षे), रत्नागिरी

अ. ‘काका अत्‍यंत साधेपणाने रहात असत.

आ. त्‍यांचा स्‍वभाव शांत आणि निगर्वी होता.’

४. श्री. प्रभाकर सुपल (आध्‍यात्मिक पातळी ६६ टक्‍के, वय ७० वर्षे), रत्नागिरी

४ अ. अल्‍प अहं : ते प्रथम श्रेणी वन अधिकारी म्‍हणून निवृत्त झाले; परंतु त्‍यांनी तसे कधी जाणवू दिले नाही.

(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ११.४.२०२३)