पू. सौरभ जोशी स्पष्टपणे काही शब्द बोलू लागल्यावर त्यांचे वडील श्री. संजय जोशी यांनी परात्पर गुरु डॉक्टरांप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता !

चैत्र कृष्ण अष्टमी (१३.४.२०२३) या दिवशी सनातनचे ३२ वे संत पू. सौरभ संजय जोशी यांचा २७ वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्यांच्या वडिलांनी ‘पू. सौरभदादांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा कशी अनुभवली ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. सौरभ जोशी

१. पू. सौरभदादांना यज्ञस्थळी नेण्याविषयी उत्तरदायी साधकांना विचारल्यावर त्यांनी ‘पू. दादा स्वतःहून सांगतील, तेव्हा बघू’, असे सांगणे आणि यातून ‘पू. दादा बोलतील’, असा परात्पर गुरु डॉक्टरांचा संकल्प झाला’, असे वाटून आनंद होणे

श्री. संजय जोशी

‘वर्ष २०१९ मध्ये रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात हनुमत्कवच यज्ञ झाला होता. त्या वेळी पू. सौरभदादांना (पू. सौरभ जोशी यांना) यज्ञस्थळी नेण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा एक यज्ञ झाला. तेव्हा मी पू. सौरभदादांना विचारले, ‘‘पू. दादा, यज्ञाला जायचे का ?’’ त्यावर पू. दादांनी ‘हो’ म्हटले. मी आश्रमातील उत्तरदायी साधकांना सांगितले, ‘‘पू. दादा यज्ञाला जायचे आहे’, असे म्हणतात.’’ त्या वेळी उत्तरदायी साधकांनी मला विचारले, ‘‘पू. दादांनी स्वतःहून सांगितले कि तुम्ही त्यांना विचारल्यावर त्यांनी उत्तर दिले आहे ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘मी पू. दादांना विचारल्यावर ते ‘हो’ म्हणाले आहेत.’’ त्या वेळी उत्तरदायी साधक म्हणाले, ‘‘पू. दादा स्वतःहून सांगतील, तेव्हा आपण बघू.’’ हे ऐकून मला आनंद झाला आणि ‘उत्तरदायी साधकांनी असे सांगणे’, म्हणजे ‘प.पू. गुरुदेवांनीच ‘पू. दादा बोलतील’, असा संकल्प केला’, असे मला वाटले.

पू. दादा पूर्वीही काही शब्द बोलण्याचा प्रयत्न करायचे; मात्र या प्रसंगानंतर त्यांच्या बोलण्यात बर्‍याच प्रमाणात स्पष्टता येऊ लागली.

२. पू. सौरभदादांनी ‘यज्ञ, यज्ञ’ असे स्पष्टपणे म्हणून जणू यज्ञाविषयी पूर्वसूचना देणे आणि यातून परात्पर गुरु डॉक्टरांच्या संकल्पाची प्रचीती येणे 

त्यानंतर मार्च २०२० मध्ये अकस्मात् पू. दादांनी दोन दिवस ‘यज्ञ, यज्ञ’ असे म्हटले आणि नंतर आश्रमात यज्ञ झाला, तसेच हवनही चालू झाले. तेव्हा ‘पू. दादांनी ‘यज्ञ होणार’, याची पूर्वसूचनाच दिली’, असे मला वाटले. पू. दादांनी ‘यज्ञ, यज्ञ’, असे स्पष्टपणे म्हटल्यावर मला प.पू. गुरुमाऊलींची सर्वशक्तीमानता आणि सर्वज्ञता यांची प्रचीती आली. तेव्हापासून गुरुमाऊलींच्या कृपेने, म्हणजेच पू. सौरभदादांवर असलेल्या ‘श्रीं’च्या कृपेमुळे पू. दादा पूर्वीपेक्षाही चांगल्या प्रकारे बोलण्याचा प्रयत्न करू लागले.

३. त्याच कालावधीत रामनाथी आश्रमात एक संत आले होते. त्यांनी आम्हाला ‘पू. दादा बोलतील’, असे सांगितले. तेव्हा ‘त्यांच्या माध्यमातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच असे सांगितले आहे’, असा भाव माझ्या मनात निर्माण झाला.

गुरुमाऊलींच्या कृपेविषयी एवढेच सांगावेसे वाटते,

‘मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।
यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् ।।’

अर्थ : ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते, त्या परमानंदस्वरूप माधवाला (श्रीकृष्णाला) मी नमस्कार करतो.’

– श्री. संजय जोशी (पू. सौरभदादांचे वडील), पिंगुळी, कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक