सीमेपलीकडून ड्रोनद्वारे शस्त्रे पाठवणार्‍या देशांना उत्तरदायी ठरवा ! – रचिरा कंबोज, संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या राजदूत

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताची पाकचे नाव न घेता मागणी !

रचिरा कंबोज

वाशिंग्टन (अमेरिका) – काही देश आतंकवाद्यांशी हातमिळवणी करत आहेत. ते ड्रोनच्या माध्यमांतून अवैधरित्या सीमेपलीकडे शस्त्रे पाठवत आहेत. हे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. अशा देशांना त्यांच्या या कामांसाठी उत्तरदायी ठरवले पाहिजे, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेमध्ये पाकचे नाव न घेता केली. संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या राजदूत रचिरा कंबोज यांनी रशियाच्या अध्यक्षतेखालील या परिषदेत ‘आंतराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेसमोरील धोके’ या विषयावरील चर्चेत वरील भूमिका मांडली. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन करून शस्त्रे पाठवून भू राजनैतिक तणाव वाढवण्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

संपादकीय भूमिका 

भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकचे नाव न घेता अशा प्रकारे मागणी करणे अपेक्षित नाही, तर स्वतः पाकवर थेट कारवाई करून पाकचा उपद्रव रोखणे आवश्यक आहे ! अन्य देश संयुक्त राष्ट्रांमध्ये रडगाणे न गाता स्वतः थेट कारवाई करतात !