आफ्रिका खंडातील ३ देशांमध्ये इस्लामिक स्टेटच्या आक्रमणात १४४ जण ठार !

नवी देहली – आफ्रिका खंडातील कांगो, नायजेरिया, बुर्किनो फासो या देशांमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी १४४ लोकांना ठार मारले, तर ८० महिला आणि मुले यांचे अपहरण केले. कांगोमध्ये २०, बुर्किनो फासोमध्ये ४४, तर नायजेरीमध्ये ८० जणांना ठार करण्यात आले आहे. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेने घेतले आहे. गोळ्या घालून आणि शिरच्छेद करून या लोकांच्या हत्या करण्यात आल्या आहेत.

संपादकीय भूमिका

जगभरात जिहादी आतंकवादी लोकांना ठार करत असतांना जगातील एकतरी इस्लामी संघटना, त्यांचे नेते, प्रमुख धर्मगुरु कधी त्यांचा विरोध करत नाहीत, हे लक्षात घ्या !