इंग्रजांनी कोहिनूरच नव्हे, पाचूजडित कमरबंद, २२२ मोत्यांचा हार आदी दागिन्यांची भारतातून केली होती लूट !

‘द गार्डियन’ने दिली माहिती

लंडन (ब्रिटन) – ‘द गार्डियन’ या ब्रिटनमधील दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार इंग्रजांनी कोहिनूर हिर्‍याच्या व्यतिरिक्त अनेक मौल्यवान रत्नजडित दागिनेही भारतातून लुटले होते. या लुटीत मूर्ती, चित्रकृती यांच्यासह १९ पाचूजडित सोन्याच्या एका कमरबंदचाही समावेश होता. ब्रिटीश सत्ताकाळातील शासकीय विभाग ‘इंडिया ऑफिस’च्या अभिलेखागारातील ४६ पानी धारिकांच्या (फाईल्सच्या) आधारे हा दावा करण्यात आला आहे. त्यात एका पडताळणीचा उल्लेख आहे. त्यात महाराणी मॅरी (एलिझाबेथ द्वितीय यांची आजी) यांच्या हवाल्याने त्यांच्या शाही दागिन्यांच्या स्रोताचा उल्लेख केला गेला आहे. ही रत्ने राणी व्हिक्टोरियाकडे पाठवण्याच्या आधी अनेक मोगल शासकांकडे राहिली. वर्ष १९८७ मध्ये रॉयल ज्वेलरीच्या अभ्यासात लेस्ली फील्ड याने मोत्यांच्या २ हारांचा उल्लेख केला होता. त्यात २२२ मोती आणि हिरे आणि माणिकही होते. हे महाराजा रणजित सिंह यांचे होते, असा दावा आहे.

संपादकीय भूमिका

भारत सरकार हे दागिने परत भारतात आणण्यासाठी प्रयत्न करणार का ?