प्रत्येक वर्षी श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांधांकडून ठिकठिकाणी, विशेषतः बंगाल, बिहार, उत्तरप्रदेश आदी राज्यांत न चुकता दंगली घडवण्यात येतात. या दंगलींची पद्धत पाहिल्यास ‘त्या अत्यंत सुनियोजितपणे केल्या जातात’, हे सांगायला कुणा तज्ञाची आवश्यकता नाही. यंदा तर श्रीरामनवमीच्या दिवशी भारतातील एक-दोन नव्हे, तर तब्बल ७ राज्यांत सुनियोजित दंगली घडवण्यात आल्या. त्यात गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, झारखंड, उत्तरप्रदेश, बिहार आणि बंगाल या राज्यांचा समावेश आहे. बिहारमधील सासाराम, भागलपूर आणि बिहारशरीफ येथे श्रीरामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर धर्मांध मुसलमानांनी आक्रमण केले. केवळ दगडफेक आणि आक्रमण यांपुरतीच ही दंगल सीमित राहिली नाही, तर यात धर्मांधांकडून चक्क बाँबचाही वापर करण्यात आला. आतापर्यंत जे बाँब केवळ जिहादी आतंकवादी हिंदूंविरुद्ध वापरत होते, तेच बाँब आता धर्मांध मुसलमानही वापरू लागले आहेत. यावरून धर्मांध मुसलमान कशा प्रकारे हिंदूंच्या जिवावर उठले आहेत, हे लक्षात येईल.
बिहारमधील दंगलीच्या वेळी काही धर्मांध मुसलमान एका मशिदीजवळ बाँब बनवत होते. त्यांच्या दुर्दैवाने ते बाँब बनवत असतांनाच तो फुटला. त्यात ६ धर्मांध मुसलमान घायाळ झाले; परंतु या धर्मांधांविरुद्ध ठोस कारवाई ना कुठल्या अन्वेषण यंत्रणांनी केली, ना बिहार सरकारने ! मुसलमान बाँब बनवत असतांना तो फुटल्याचा हा पहिलाच प्रकार नाही. बंगालमध्ये असे प्रकार नित्य घडत असतात. त्यात तृणमूल काँग्रेसचे अनेक धर्मांध कार्यकर्ते ठार झाले आहेत. तरीही आजपावेतो तो पक्ष बंगालमध्ये प्रचंड बहुमताने निवडून येतो. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई होणे तर सोडाच; पण त्यांची साधी चौकशी तरी होते का ? हा प्रश्नच आहे. परिणामी बंगालमध्ये बाँब बनवणे आणि तो बनवतांना फुटणे, याला साधे फटाके फुटण्याइतकेच महत्त्व आहे. आता बिहारमध्येही अशाच प्रकारे बाँब बनवतांना तो फुटला, तरीही अद्याप दोषींवर कठोर कारवाई केल्याचे ऐकिवात नाही. उलट बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार नेहालुद्दीन यांनी ‘मरण्यापेक्षा काही तरी करणे योग्यच आहे. मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. हे बोल कुठल्या साध्यासुध्या माणसाचे नाहीत, तर कायदे मंडळाचा सदस्य असलेल्या एका आमदाराचे आहेत. ‘चोराच्या उलट्या बोंबा’ म्हणतात ते याला ! ज्यांनी कायदे करायचे, त्यांनीच ते सोयीप्रमाणे वाकवायचे, ही लबाडी केवळ असे धर्मांधच करू शकतात. या लेखाच्या आरंभीपासून येथपर्यंत आपण जी जी उदाहरणे पाहिली, त्या सर्वांमध्ये एक गोष्ट समान आढळून येते, ती ही की, धर्मांध मुसलमान आणि त्यांचे धर्मांध नेते कायद्याला हव्या तेव्हा अन् हव्या तशा वाकुल्या दाखवतात. याखेरीज वरील कुठल्याही प्रकरणांत धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा झाल्याचे ऐकिवात नाही, हीसुद्धा वरील प्रकरणांतील आणखी एक समान गोष्ट आहे.
धर्म पाहून कारवाई होते का ?
असेच प्रकरण वर्ष २००६ मध्ये हिंदूंच्या संदर्भात घडले होते. नांदेड येथे बाँब बनवतांना दोघा जणांचा मृत्यू झाला होता. हे दोघे जण संघ परिवाराशी संबंधित असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्या वेळी काँग्रेसवाले, साम्यवादी, हिंदुद्वेषी प्रसारमाध्यमे, पुरो(अधो)गामी आदींनी आकाश-पाताळ एक केले होते. या सर्वांनी मिळूनच ‘हिंदु आतंकवाद’ हा शब्द जन्माला घातला. नांदेड प्रकरणाची अगदी तात्काळ नोंद घेत त्याचे अन्वेषण आरंभी आतंकवादविरोधी पथक, केंद्रीय अन्वेषण विभाग आणि नंतर थेट राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा यांनी केले होते. अशा घटना घडल्यावर कायद्यानुसार योग्य ते सर्व झालेच पाहिजे; परंतु हा नियम धर्मांधांच्या प्रकरणांत तितकासा लागू होतांना दिसत नाही. यालाच ‘सेक्युलॅरिझम’ (निधर्मीवाद) म्हणायचे का ? ‘नांदेडमध्ये फुटला तो बाँब आणि बिहारमध्ये फुटले ते फटाके’, असे अन्वेषण यंत्रणांना वाटते का ? कुठल्याही प्रकरणात यंत्रणांनी कुणाच्याही दबावाला बळी न पडता स्वतःचे काम कायद्यानुसार चोखपणे बजावले पाहिजे. अशा प्रकरणांत जो कुणी दोषी असेल, त्याला कायद्यानुसार शिक्षा केली पाहिजे. दुर्दैवाने असे होतांना दिसत नाही. त्यामुळे लोकांचा पोलीस यंत्रणेवरचा उरला-सुरला विश्वासही उडत चालला आहे. अनेक वेळेला हिंदूंच्या दसरा मेळाव्यात केवळ लाठी-काठी हातात धरली, तरी काँग्रेसवाले, पुरोगामी आदी सर्व हिंदुद्वेषी मंडळी आरडाओरडा करतात आणि ‘अल्पसंख्यांक समाज असुरक्षित आहे’, ‘लोकशाही धोक्यात आहे’, अशी आवई उठवतात. आता हीच मंडळी बिहारमध्ये धर्मांध मुसलमान प्रत्यक्ष बाँब बनवत असतांना एका शब्दानेही निषेध करत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे.
हिंदूंनाच स्वसंरक्षणाची खरी आवश्यकता !
आमदार नेहालुद्दीन यांनी केलेले विधान भयानक आहे. आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास धर्मांध मुसलमानांनीच हिंदूंवर प्रथम आक्रमण केल्याचे आढळून येईल. दंगली, बाँबस्फोट, लव्ह जिहाद, भूमी जिहाद, धर्मांतर, हत्या आदी गुन्हे करण्यात धर्मांधच अग्रेसर असतात. मग अशा आक्रमकांना नेमके कुणापासून संरक्षण हवे आहे ? ‘मुसलमानांना स्वतःचे संरक्षण करावेसे वाटते’, असे आक्रमण त्यांच्यावर कोण करत आहे ? हे जनतेला कळले पाहिजे. वास्तविक धर्मांधांपासून हिंदूच खर्या अर्थाने असुरक्षित आहेत. त्यामुळे हिंदूंनाच खरी स्वसंरक्षणाची आवश्यकता आहे. असे असतांना नेहालुद्दीन यांचे ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते’, हे विधान म्हणजे जनतेच्या डोळ्यांत केलेली धूळफेक आहे. गुन्हेगारांना पाठीशी घालणार्या अशा लोकांवरही कारवाई झाली पाहिजे आणि त्यांचे आमदारपद रहित केले पाहिजे. भारतात धर्मांधांना जर एवढेच भय किंवा असुरक्षितता वाटत असेल, तर त्यांनी त्यांना सुरक्षित वाटेल, त्या देशात खुशाल निघून जावे; पण विनाकारण हिंदूंना अपकीर्त करू नये !
देशात हिंदूच खर्या अर्थाने असुरक्षित असतांना आक्रमकांना नेमके कुणापासून संरक्षण हवे आहे ? |