टोकियो (जपान) येथील एका उपाहारगृहात अन्नपदार्थ ग्रहण करतांना भ्रमषभाष पहाण्यावर बंदी !

टोकियो (जपान) – येथील ‘डेबू चैन’ नावाच्या एका उपाहारगृहामध्ये अन्नपदार्थ ग्रहण करतांना ग्राहकांना भ्रमणभाष पहाण्यास बंदी घालण्यात आली आहे. या नियमामुळे उपाहारगृहाच्या मालकाचे कौतुक होत आहे. या उपाहारगृहात ग्राहकांना बसण्यासाठी केवळ ३० जागा आहेत आणि त्यांनी उपाहारगृहात कुठेही हा नियम लिहिला नसून येथील कर्मचारी स्वत: ग्राहकांच्या पटलाकडे (टेबलकडे) जाऊन या नियमाविषयी सांगतात.

येथे ‘रॅमेन नूडल्स’ नावाचा पदार्थ प्रसिद्ध आहे. हा पदार्थ खाण्यासाठी येथे बरेच ग्राहक येतात आणि उशिरापर्यंत थांबतात. काही जण तर रॅमेन थंड होईपर्यंत बराच वेळ भ्रमणभाषवर बोलत रहातात किंवा त्यांच्या व्हिडिओ पहात जेवतात. यामुळे त्यांना उशीर होतो आणि अन्य ग्राहकांना बाहेर ताटकळत रहावे लागते. यामुळे येथे भ्रमणभाषवर बंदी घालण्यात आली आहे.