(म्हणे) ‘मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते !’ – आमदार महंमद नेहालुद्दीन, राष्ट्रीय जनता दल

बिहारमधील सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार महंमद नेहालुद्दीन यांचे कायदाद्रोही विधान !

आमदार महंमद नेहालुद्दीन

पाटलीपुत्र (बिहार) – रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीवर बिहारच्या सासाराम, भागलपूर आणि बिहारशरीफ येथे धर्मांध मुसलमानांनी आक्रमणे केली. धर्मांधांकडून बाँबस्फोटही  घडवण्यात आले. एका मशिदीजवळ बाँब बनवतांना स्फोट होऊन ६ धर्मांध घायाळही झाले होते. या दंगलींमध्ये मोठी हानी झाली. या पार्श्‍वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रीय जनता दलाचे आमदार महंमद नेहालुद्दीन यांनी बाँब बनवणार्‍या धर्मांध मुसलमानांचे समर्थन केले. नेहालुद्दीन यांनी ‘इंडिया टीव्ही’च्या प्रतिनिधीकडे प्रतिक्रिया व्यक्त करतांना म्हटले, ‘मरण्यापेक्षा काहीतरी करणे योग्यच आहे. मुसलमान तरुण स्वसंरक्षणार्थ बाँब बनवत होते.’ (बिहारमध्ये धर्मांध मुसलमानांनी रामनवमीच्या मिरवणुकीवर आक्रमण करून वर बाँब बनवण्याचे समर्थन करणे म्हणजे ‘चोर तो चोर वर शिरजोर’ होय ! – संपादक)

मुख्यमंत्री नितीश कुमार इफ्तारच्या मेजवानीत दंग !

राज्यात एकीकडे दंगली घडवल्या जात असतांना दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे पाटलीपुत्र येथील फुलवारीशरीफमध्ये ‘इस्लामिया ग्रुप ऑफ इंन्स्टिट्यूशन’च्या इफ्तारच्या मेजवानीमध्ये सहभागी झाले होते. यावरून सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. (अशा प्रकारच्या मेजवानीत सहभागी होऊन नितीश कुमार ‘मी पीडित हिंदूंच्या नाही, तर दंगलखोरांच्या पाठीशी आहे’, असा संदेशच देत आहेत. ही स्थिती हिंदु राष्ट्र अपरिहार्य करते ! – संपादक)

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंनीही आता हेच करावे का ? अशा प्रकारचे विधान करून आमदार नेहालुद्दीन बाँब बनवण्याचे समर्थनच करत आहेत. अशा आमदारावर आणि त्याच्या पक्षावर बंदीच घातली पाहिजे !
  • अशा प्रकारचे विधान भाजपच्या आमदाराने केले असते, तर एव्हाना देश आणि विदेश येथील निधर्मीवाद्यांनी आकाशपाताळ एक केले असते आणि हिंदूंना तालिबानी ठरवण्यात आले असते; मात्र नेहालुद्दीन यांच्या संदर्भात सारे काही शांत आहे !