शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग बनणार !

पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत ठराव संमत !

शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग (कॉरिडॉर) बनवण्याचा ठराव पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत संमत !

इस्लामाबाद – पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम नदीकिनारी वसलेल्या शारदा पीठासाठी सुसज्ज मार्ग (कॉरिडॉर) बनवण्याचा ठराव पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत संमत करण्यात आला. यामुळे भारतातील भाविकांना श्री शारदामातेच्या दर्शनाला जाणे सुलभ होणार आहे. शारदापीठाकडे जाणारा सुसज्ज मार्ग हा ४० किलोमीटरचा असेल. तो काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातून चालू होईल. शारदा पीठाकडे जाण्यासाठी भक्तांना नारद, सरस्वती आणि नारील सरोवर पार करावे लागेल.

(सौजन्य : Zee News) 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काही दिवसांपूर्वीच ‘कर्तारपूर कॉरिडॉर’प्रमाणे शारदामातेच्या पीठासाठीही कॉरिडॉर व्हायला हवा’, असे विधान केले होते.

‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता

आता पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेने हा ठराव संमत केल्यानंतर ‘शारदा वाचवा समिती’ने याचे स्वागत केले आहे. ‘सुसज्ज मार्ग बांधण्याच्या मागणीसाठी या समितीने अनेक वर्षे लढा दिला आहे. तथापि सध्या शारदा पीठ मंदिराची मात्र दुरवस्था झाली आहे’, असे म्हटले आहे.

 पाकचा आक्षेप !

पाकव्याप्त काश्मीरमधील संसदेत हा प्रस्ताव संमत करण्यावर पाकचे भारतातील माजी राजदूत अब्दुल बासित यांनी आक्षेप घेतला आहे.

‘शारदा वाचवा समिती’चे प्रमुख रवींद्र पंडिता यांनी बासित यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.