पाटलीपुत्र – राज्यातील सासाराम आणि बिहारशरीफ येथी दंगलखोर मोकाट फिरत आहेत. वर्ष २०२५ मध्ये राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तेव्हा जर भाजप राज्यात सत्तेत आला, तर या दंगलखोरांना उलटे टांगले जाईल, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी येथे केले. ते बिहारच्या २ दिवसांच्या दौर्यावर आहेत. बिहारमध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकींनंतर धर्मांधांनी ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडवून आणला. त्या पार्श्वभूमीवर नवादा येथे आयोजित सभेत शहा यांनी हे वक्तव्य केले.
ते पुढे म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणुकीमध्ये सध्या सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारला भाजप उखडून फेकून देईल. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी लालूप्रसाद यादव यांच्या जंगलराज देणार्या पक्षासमवेत युती केली. जंगलराज देणारा पक्ष बिहारमध्ये कधी शांती आणू शकेल का ? नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांनी लांगूलचालनाचे राजकारण केले. यामुळे आतंकवाद फोफावला.