लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे मशिदीजवळून धर्मांध मुसलमानांकडून रामनवमीच्या मिरवणुकीवर दगडफेक

  • दगडफेकीमुळे पळणार्‍या हिंदूंना पाठलाग करून मारहाण

  • धर्मांधांऐवजी हिंदूंनाच कह्यात घेतल्याने पोलीस ठाण्यात हिंदूंचे धरणे आंदोलन

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – येथील जानकीपूरम् भागातील शाही मशिदीसमोरून रामनवमीच्या दिवशी हिंदूंची मिरवणूक जात असतांना त्यावर दगडफेक करण्यात आली. या वेळी गोंधळ निर्माण झाल्याने मिरवणुकीत सहभागी हिंदू सैरावैरा पळू लागल्यावर धर्मांध मुसलमानांकडून त्यांचा पाठलाग करून हिंदूंना मारहाण केली. तसेच काही गाड्यांची तोडफोड करण्यात आली.

१. याविषयी मिरवणुकीचे संयोजक आणि भाजपचे नेते कुलदीपसिंह राठौर यांनी ‘ऑपइंडिया’ वृत्तसंकेतस्थळाच्या प्रतिनिधीला सांगितले की, आम्ही मिरवणुकीसाठी पोलिसांकडून अनुमती घेतली होती. मिरवणुकीतील सहभागी लोकांपैकी कुणीही कुणाशी वाद घातला नसतांना शाही मशिदीजळून मिरवणूक पुढे जात असतांना तेथील घरांच्या छतांवरून महिलांकडून दगडफेक चालू करण्यात आली. तसेच रस्त्यावरून अल्पवयीन मुलांकडून दगडफेक चालू झाली. या वेळी मिरवणुकीत सहभागी वाहनाची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात एक व्यक्ती घायाळ झाली. या घटनेच्या प्रकरणी पोलिसांनी मिरवणुकीत सहभागी ७ लोकांनाच कह्यात घेतले आहे. यात काही अल्पवयीन मुले आहेत. दुसरीकडे दगडफेक करणार्‍यांपैकी केवळ दोघांना कह्यात घेण्यात आले आहे.

२. या हिंसाचाराविषयी पोलीस अधिकारी बृजेश त्रिपाठी यांनी सांगितले की, अद्याप तक्रार करण्यात आलेली नसल्याने कुणावरही कारवाई करण्यात आलेली नाही. मिरवणुकीत सहभागी झालेल्यांची चौकशी करून त्यांना सोडून देण्यात आले आहे.

गेल्या वर्षीही झाला होता हिंसाचार !

कुलदीप सिंह यांनी सांगितले की, गेल्या वर्षीही रामनवमीच्या वेळी मुसलमानांकडून वाद घालण्यात आल्यानंतर हिंसाचार झाला होता. त्या वेळी गोळीबारही करण्यात आला होता. समाजवादी पक्षाचे नगरसेवक चांद यांनी लोकांना चिथावणी दिली होती, असा आरोप त्यांनी केला.

संपादकीय भूमिका

उत्तरप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असतांना अशा प्रकारचा हिंसाचार होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !