वैराटगड (जिल्हा सातारा) येथे आढळून आली पुरातन नाणी !

वैराटगड

सातारा, ३० मार्च (वार्ता.) – कराड तालुक्यातील वैराटगड येथे २८ मार्चला स्वच्छता करतांना शिवप्रेमींना पुरातन नाणी आढळून आल्याचा ‘व्हिडिओ’ सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झाला आहे. या विषयी सातारा पोलीस दल, तसेच पुरातत्व खाते यांनी चौकशी चालू केली असल्याचे समजते. नाणी कोणत्या धातूची आहेत, हे अद्याप कळू शकलेले नाही; मात्र ती शिवकालीन असल्याचा अंदाज शिवप्रेमी व्यक्त करत आहेत.