दापोली कुणबी विकास मंचच्या वतीने हळदीकुंकू समारंभ आणि महिलांचा सत्कार
दापोली, १४ मार्च (वार्ता.) – ‘लव्ह’ म्हणजे प्रेम आणि ‘जिहाद’ म्हणजे धर्मयुद्ध. चित्रपटांच्या माध्यमातून ‘लव्ह जिहाद’चा प्रसार मोठ्याप्रमाणात केला जात आहे. हिंदु संस्कृतीला काळीमा फासणार्या घटना वाढल्या आहेत. महिलांवरील अत्याचार वाढले. तरुणींना हिंदु संस्कृती आणि धर्म शिकवला पाहिजे. या क्षणापासून हिंदूंनी संघटित होणे अत्यंत आवश्यक आहे. आपण धर्माचे रक्षण केले, तरच धर्म आपले रक्षण करणार आहे. धर्माविषयीचा अभिमान अल्प झाल्याने धर्माचरण केले जात नाही. यासाठी धर्माभिमान पुन्हा जागृत करण्याची आवश्यकता आहे. आपण मुलांना पैसा कमवायला शिकवतो; मात्र संस्कार शिकवतो का ? याचे आत्मचिंतन करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. भक्ती डाफळे यांनी केले.
जागतिक महिलादिनाचे औचित्य साधून कुणबी विकास मंच, दापोलीच्या वतीने येथील चैतन्य सभागृहात महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आणि विशेष महिलांचा सत्कार अशा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी त्या बोलत होत्या.
या वेळी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्या सौ. दीपिका चिपटे, श्रीमती आर्या सुवरे (शिक्षण), सौ. स्नेहल राऊत (अंगणवाडी सेविका), सौ. दिशा मुलुख (आरोग्य सेविका), सौ. श्वेता पुलेकर, सौ. मनीषा शिगवण (कृषी), श्रीमती रंजना पोमेंडकर, सौ. रंजना टेमकर (लघुउद्योग) यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. रमेश कडू होते. श्री. योगेश टेमकर यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सौ. नेहा शिगवण यांच्या हस्ते सौ. भक्ती डाफळे यांचा शाल, श्रीफळ, भेटवस्तू आणि पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी सौ. भक्ती डाफळे यांनी ‘लव्ह जिहाद’विषयी माहिती सांगतांना स्वसंरक्षण प्रशिक्षणाची आवश्यकता सांगून अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची उदाहरणे दिले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंचाचे अध्यक्ष श्री. रमेश भुवड, श्री. नंदकुमार शिगवण, श्री. गोरीवले सर, श्री. दीपक बेनेरे सर, श्री. सुरेश रेवाळे, श्री. दिनेश मुलुख, श्री. सुरज शिगवण इत्यादींनी परिश्रम घेतले. श्रीमती मंगलताई सणस यांनी केलेल्या ऋणनिर्देशनानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचा लाभ २५० महिलांनी घेतला.