नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करणार !

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाचा निर्णय !

मुंबई – एम्.पी.एस्.सी.ने (महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाने) नवीन अभ्‍यासक्रम वर्ष २०२५ पासून लागू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. त्‍यामुळे त्‍याची सिद्धता करणार्‍या विद्यार्थ्‍यांच्‍या आंदोलनाला यश मिळाले आहे.

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाचे आभार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

महाराष्‍ट्र लोकसेवा आयोगाचे मी आभार मानतो. आम्‍हाला या प्रकरणात राजकीय श्रेय घ्‍यायचे नव्‍हते; मात्र काही लोक विद्यार्थ्‍यांच्‍या आडून त्‍याला राजकीय रंग देण्‍याचा प्रयत्न करत होते. नवीन अभ्‍यासक्रमाचा निर्णय पूर्वीच्‍या सरकारने घेतला होता. आता त्‍याची कार्यवाही कुणी करावी, यापेक्षा आम्‍ही विद्यार्थ्‍यांच्‍या मागणीचा विचार केला.