कनिष्ठ न्यायालयाने ४४ वर्षांपूर्वी लाचेच्या प्रकरणी दोषी ठरवलेल्या लिपिकाला राजस्थान उच्च न्यायालयाने निर्दोष ठरवले !

जयपूर (राजस्थान) – राजस्थान उच्च न्यायालयाने ४४ वर्षांपूर्वी १५० रुपयांच्या लाचखोरीच्या प्रकरणात सेवानिवृत्त लिपिक हरि नारायण याला निर्दोष ठरवले आहे. वर्ष १९८५ मध्ये या लिपिकाला कनिष्ठ न्यायालयाने दोषी ठरवले होते.

न्यायालयाने म्हटले की, आरोपीने लाच मागितली होती, हे सिद्ध करण्यास फिर्यादी पक्ष अपयशी ठरला आहे. केवळ पैशांची वसुली म्हणजे लाच मागण्याचा आधार होऊ शकत नाही.