राज्‍यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांचा बेमुदत संप !

अनेक विद्यापिठांच्‍या परीक्षा स्‍थगित !

मुंबई – राज्‍यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांनी विविध मागण्‍यांसाठी २ फेब्रुवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे, तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालये येथे चालू असलेल्‍या परीक्षेच्‍या कामकाजावर शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी बहिष्‍कार टाकला आहे. याचा परिणाम म्‍हणून अनेक विद्यापिठांनी २ फेब्रुवारीपासून चालू झालेल्‍या परीक्षा स्‍थगित केल्‍या आहेत. कोल्‍हापूर येथील शिवाजी विद्यापिठातील सर्व परीक्षा स्‍थगित करण्‍यात आल्‍या आहेत. एकूण ३२ परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्‍यात आले आहे. पुण्‍यश्‍लोक अहिल्‍यादेवी होळकर सोलापूर विद्यापिठाच्‍या परीक्षाही स्‍थगित केल्‍या आहेत.

काही दिवसांपूर्वी शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्‍या मागण्‍यांसंदर्भात उच्‍च आणि तंत्रशिक्षणमंत्री अन् पुण्‍याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्‍या समवेत चर्चा झाली होती. त्‍यातील मागण्‍यांची पूर्तता झाली नसल्‍याने बेमुदत संप पुकारण्‍यात आला आहे.

संपादकीय भूमिका

संप पुकारून विद्यार्थ्‍यांची शैक्षणिक हानी करण्‍यापेक्षा आपल्‍या मागण्‍यांच्‍या पूर्ततेसाठी सनदशीर मार्ग अवलंबा !