ठाकुर्ली (ठाणे) येथे अल्पवयीन मुलीवरील सामूहिक बलात्कारप्रकरणी दोघांना अटक !

ठाणे, ३० जानेवारी (वार्ता.) – ठाकुर्ली (पश्चिम) रेल्वे स्थानकाजवळील गर्द झाडीत १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर पोलीस असल्याची बतावणी करून २ अज्ञात तरुणांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना २७ जानेवारी या दिवशी घडली होती. या प्रकरणी पीडित तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी २ तरुणांविरुद्ध लैंगिक अत्याचार आणि बाल लैंगिक अत्याचार कायद्यानुसार गुन्हा नोंद केला आहे. आरोपींच्या अन्वेषणासाठी पोलिसांची ५ पथके सिद्ध करून विविध भागांत रवाना करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी विष्णु भांडेकर (वय २५ वर्षे) आणि आशिष गुप्ता (वय ३२ वर्षे) या दोघांना अटक केली आहे. विष्णु सराईत गुन्हेगार असून त्याला यापूर्वी घरफोडी प्रकरणात अटक करण्यात आली होती. या प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्याचे पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत. (गुन्हेगारांना कठोर शिक्षा होत नसल्यामुळेच त्यांना कायद्याचे भय वाटत नाही. – संपादक)

संपादकीय भूमिका 

बलात्कार्‍यांना कठोर शिक्षा झाल्याविना हे प्रकार थांबणार नाहीत !