मोदी यांच्‍या विरोधात माहितीपट बनवणार्‍यांची स्‍वतंत्र चौकशी करा !

ब्रिटनमध्‍ये ऑनलाईन मोहिमेद्वारे मागणी !

लंडन – भारतातील गुजरातमध्‍ये वर्ष २००२ मध्‍ये झालेल्‍या दंगलींचा ठपका भारताचे पंतप्रधान आणि तत्‍कालीन मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍यावर ठेवणारा २ भागांचा माहितीपट बीबीसीने प्रसारित केला होता. या प्रकरणी बीबीसीवर टीकेची झोड उठली असून हा माहितीपट बनवणार्‍यांची स्‍वतंत्र चौकशी करण्‍याची मागणी करण्‍यात आली आहे.

या प्रकरणी आता ‘Change.Org’ वर बीबीसीच्‍या विरोधात ऑनलाईन स्‍वाक्षरी मोहीम राबवली जात आहे. (ब्रिटनमध्‍ये अशी मागणी होत असतांना भारतानेही हिंदुद्वेषी आणि भारतद्वेषी बीबीसीवर कारवाई होण्‍यासाठी ब्रिटनवर दबाव टाकणे आवश्‍यक ! – संपादक)

बीबीसीने हा माहितीपट प्रसारित केल्‍यानंतर भारत सरकारने, ‘हा अपप्रचाराचा भाग आहे’, असे म्‍हटले होते. हे प्रकरण पाकिस्‍तानी वंशाच्‍या खासदाराने ब्रिटीश संसदेत उपस्‍थित करून या दंगलींच्‍या मागे मोदी यांचा हात असल्‍याचा कांगावा केला होता. त्‍या वेळी पंतप्रधान ऋषी सुनक यांनी ‘मी या भूमिकेशी असहमत आहे’, असे म्‍हटले होते.