दैनिक ‘केसरी’च्‍या पिंपरी कार्यालयाचे प्रमुख ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले यांचे हृदयविकाराने निधन !

ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले

पिंपरी-चिंचवड – येथील ज्‍येष्‍ठ पत्रकार विजय भोसले (वय ६६ वर्षे) यांचे २३ जानेवारी या दिवशी हृदयविकाराने निधन झाले आहे. पिंपरी-चिंचवड शहर पत्रकारितेत गेली अनेक वर्षे ते कार्यरत होते. राज्‍य विधीमंडळ अधिवेशनाच्‍या वार्तांकनाने विजय भोसले यांच्‍या पत्रकारितेची कारकीर्द ओळखली जात होती. त्‍याचसह त्‍यांनी पिंपरी महापालिकेचेही वार्तांकन केले. ते दैनिक ‘केसरी’च्‍या पिंपरी कार्यालयाचे प्रमुख होते. पत्रकारितेतील अनुभवी व्‍यक्‍तिमत्त्व म्‍हणून त्‍यांच्‍याकडे पाहिले जायचे. भोसले यांनी एकदा महापालिकेची निवडणूकही लढवली होती. त्‍यांच्‍या पश्‍चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्‍यांच्‍या निधनाने पत्रकारिता क्षेत्राला मोठा धक्‍का बसला आहे.