सनातनचे सूक्ष्म ज्ञानप्राप्तकर्ते साधक ईश्वराची कृपा आणि संतांचे चैतन्य यांमुळे, तसेच स्वत:ची साधना, सेवा अन् कृतज्ञता म्हणून सूक्ष्म परीक्षण मांडत असल्याने त्यांच्याप्रती समष्टी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक नसणे‘२९.६.२०२२ या दिवशी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात सूत्रसंचालिका साधिकेने सांगितले, ‘‘सूक्ष्म जगताच्या संदर्भात माहिती मिळत असल्याने आम्ही सर्व ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो.’’ हे ऐकून उपस्थित सद़्गुरु आणि संत यांनीही हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली. वरील कृती मला मानसिक स्तरावरची वाटली आणि त्यामुळे वायूमंडलातील चैतन्य काही प्रमाणात अल्प झाल्याचे लक्षात आले. या संदर्भात असे लक्षात आले, ‘ज्या प्रकारे कार्यक्रमात उपस्थित साधकांना संतांच्या चैतन्यामुळे अनुभूती येतात, त्या प्रकारे ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांनाही संतांच्या चैतन्यामुळे ईश्वरी ज्ञान मिळते. अनिष्ट शक्तींच्या आक्रमणांमुळे अनेक वेळा ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची सूक्ष्म परीक्षण करण्याची स्थितीही नसते आणि त्यांना ज्ञानही मिळत नाही. केवळ आणि केवळ संतांच्या चैतन्यामुळे त्यांना सूक्ष्म स्तरावरील विविध सूत्रे कळतात. ज्या प्रकारे अन्य साधक त्यांना आलेल्या अनुभूती कृतज्ञतास्वरूप सांगतात किंवा लिहून देतात, त्या प्रकारे ज्ञानप्राप्तकर्ते साधकही त्यांचे सूक्ष्म परीक्षण सांगतात. ‘सूक्ष्म परीक्षण करणे, लिहिणे आणि सांगणे’, ही ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांची साधना, सेवा अन् संत आणि गुरूंच्या प्रती कृतज्ञता असल्याने त्यांच्या संदर्भात समष्टी कृतज्ञता आवश्यक नाही. याउलट अशा कृतज्ञतेमुळे समष्टीचा, मुख्यत्वे सोहळ्यातील उपस्थित संतांचा वेळ वाया जातो, तसेच अशा कृतीतून ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या अहंमध्ये वाढही होऊ शकते. यामुळे अशा कृती करणे टाळावे.’ – श्री. निषाद देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२, रात्री १०.४०) श्री. निषाद देशमुख : वरील विचार योग्य कि अयोग्य ? (परात्पर गुरु) डॉ. आठवले : ज्ञानप्राप्तकर्ते साधक आणि ज्ञान मिळाल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारे साधक दोघेही योग्य आहेत. ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या अहंमध्ये वाढही होऊ शकते; पण त्या वेळी त्यांचे मार्गदर्शक त्यांना सूक्ष्मातून अहंची जाणीव करून देतात. त्यामुळे त्यांचा अहं वाढलेला असल्यास तो अल्प होतो. काही वर्षांनी त्यांचा अहं वाढत नाही. |
‘२९.६.२०२२ या दिवशी ‘हिंदु जनजागृती समिती’चे धर्मप्रचारक पू. नीलेश सिंगबाळ (वय ५५ वर्षे) यांची आध्यात्मिक पातळी ८१ टक्के असून ते सद़्गुरुपदावर विराजमान झाले आहेत’, असे एका सोहळ्याच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. या आध्यात्मिक सोहळ्याचे देवाच्या कृपेने झालेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे. १८.१.२०२३ या दिवशी सूक्ष्म परीक्षणाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/646295.html
९. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांना आणि सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना नमस्कार केल्यावर दोन्ही संतांमध्ये व्यष्टी अन् समष्टी भावांचा संगम झाल्याने वायूमंडलात अद्वैताचे सूक्ष्म कण पसरणे
श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांचा सन्मान केल्यानंतर श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या पायांवर डोके टेकवून नमस्कार केला. त्यानंतर सद़्गुरु सिंगबाळ यांनीही त्याच प्रकारे श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना नमस्कार केला. दोन्ही संत एकमेकांना नमस्कार करतांना वातावरणातील निर्गुण तत्त्वात पुष्कळ वाढ झाली होती, तसेच वायूमंडलात आकाशगंगेच्या रूपातील अत्यंत शुभ्र रंगाची आकृती निर्माण होऊन तिच्यातून असंख्य कण वायूमंडलात पसरत होते. त्या कणांकडे पाहिल्यावर माझे ध्यान लागून मला शांतीची अनुभूती येत होती. ‘ही अद्वैताची अनुभूती आहे’, असे मला जाणवले.
९ अ. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांना नमस्कार करणे’ या कृतीद्वारे त्यांनी सर्वत्रच्या समष्टीला चराचरातील गुरुस्वरूपाप्रती कृतज्ञ रहाण्याची आणि धर्माचरण करण्याची,
म्हणजे व्यष्टी भावाची शिकवण देणे : यापूर्वी झालेल्या कोणत्याही आध्यात्मिक सोहळ्यात मला अशी अद्वैताची अनुभूती आली नव्हती. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांची आध्यात्मिक पातळी उच्च असून त्या समष्टी संत आहेत. समष्टी संतांमध्ये सतत समष्टी भाव जागृत असतो. उच्च पातळीचे समष्टी संत सर्व लौकिक बंधनांच्या पलीकडे असतात. त्यामुळे अध्यात्मशास्त्रदृष्ट्या श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु सिंगबाळ यांना नमस्कार करणे आवश्यक नव्हते. असे असूनही ‘पती हा पत्नीसाठी आद्य गुरु असतो’, अशा व्यष्टी भावातून श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांनी सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांना नमस्कार केला आणि त्याद्वारे सर्वत्रच्या समष्टीला चराचरातील गुरुस्वरूपाप्रती कृतज्ञ रहाण्याची आणि धर्माचरण करण्याची शिकवण दिली.’
९ आ. ‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांना नमस्कार करणे’, या कृतीद्वारे त्यांनी ‘समष्टी शिष्यभाव कसा असायला हवा ? आणि पती-पत्नीचे आध्यात्मिक नाते कशा प्रकारे जगावे ?’, याची समष्टीला शिकवण देणे : ज्या वेळी एखाद्या जिवाचा सन्मान होत असतो, त्या वेळी तो अनुभवत असलेली गुरुकृपा आणि ईश्वरीकृपा यांमुळे त्याचा व्यष्टी भावच जागृत असतो. अशा वेळी समष्टी भाव जागृत होणे पुष्कळ कठीण असते. असे असूनही सद़्गुरु सिंगबाळ यांनी ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी असून त्या गुरुच आहेत’, अशा समष्टी भावाने श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ यांच्या चरणांवर डोके ठेवून नमस्कार केला. या कृतीतून सद़्गुरु सिंगबाळ यांनी ‘समष्टी शिष्यभाव कसा असायला हवा ? आणि पती-पत्नीचे आध्यात्मिक नाते कशा प्रकारे जगावे ?’, याची समष्टीला शिकवण दिली.
९ इ. दोन्ही संतांनी केलेल्या आदर्श कृतीतून व्यष्टी आणि समष्टी भाव यांचा संगम होऊन समष्टीला अद्वैताची अनुभूती येणे : दोन्ही संतांनी केलेल्या आदर्श कृतीतून त्यांच्यात एकाच वेळी व्यष्टी आणि समष्टी भाव यांचा संगम झाला. केवळ व्यष्टी भाव किंवा केवळ समष्टी भाव यांमुळे ईश्वर मिळत नाही. याउलट ज्या वेळी व्यष्टी आणि समष्टी भाव यांचा संगम होतो, त्या वेळी भक्त आणि भगवंत यांच्यातील मन, बुद्धी आणि अहं रूपी द्वैत समाप्त होऊन तिथे अद्वैत निर्माण होते. साधनेच्या योग्य क्रियमाणामुळे काही कालावधीसाठी श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि सद़्गुरु सिंगबाळ हे दोन्ही संत अद्वैताच्या स्थितीत असून त्याचा परिणाम उपस्थित समष्टीवरही झाल्याने समष्टीला काही प्रमाणात अद्वैताची (शांतीची) अनुभूती आली.’ (हीच प्रक्रिया सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी एकमेकांना नमस्कार केल्यावरही घडली.)
१०. समष्टी भावामुळे मनोगत व्यक्त करतांना सद़्गुरु सिंगबाळ यांच्याकडून समष्टीसाठी चैतन्य प्रक्षेपित होणे
सन्मान सोहळ्यानंतर मनोगत व्यक्त करतांना सद़्गुरु सिंगबाळ यांचा समष्टी भाव जागृत होता. त्या वेळी त्यांच्याकडून प्रकाशाच्या प्रवाहाप्रमाणे चैतन्य प्रक्षेपित होत होते. त्यांच्यातील साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या तळमळीमुळे त्यांच्याकडून प्रक्षेपित होणारा चैतन्याचा प्रवाह केवळ उपस्थित साधकांना नाही, तर विश्वातील तळमळीने साधनेचे प्रयत्न करणार्या साधकांपर्यंत पोचत आहे’, असे दिसले.
११. कृतज्ञता
‘जे भगवान शिवाप्रमाणे अखंड साधनारत राहून श्रीरामस्वरूपी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे गुणवर्णन करतात आणि ज्यांचे आचरण भगवान श्रीरामाप्रमाणे आदर्श अन् कल्याणकारी आहे’, अशा सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्या सन्मान सोहळ्याचे सूक्ष्म परीक्षण देव आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी करवून घेतले, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता. ‘सद़्गुरु नीलेश सिंगबाळ यांच्यातील विनम्रता, तळमळ आणि अन्य आध्यात्मिक गुण माझ्यासह सर्व साधकांमध्ये निर्माण व्हावे’, अशी ईश्वराच्या चरणी प्रार्थना.’ (समाप्त)
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१.७.२०२२, रात्री १०.३०)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात. सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला सूक्ष्म-परीक्षण म्हणतात. |