जम्मूमधील मुसलमानबहुल गावात हिंदूंच्या घरांवर दगडफेक !

पुंछ (जम्मू-काश्मीर) – येथील मुसलमानबहुल बैछ या गावामध्ये हिंदूंच्या घरांवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत खिडक्यांच्या काचा फुटल्या. ही दगडफेक कुणी केली, हे समजू शकलेले नाही.

या गावात हिंदूंची केवळ ३५ घरे आहेत. या दगडफेकीमुळे घाबरलेल्या हिंदूंनी पोलिसांकडे संरक्षणाची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन हिंदूंना त्यांच्या सुरक्षेविषयी आश्‍वस्त केले आहे. यापूर्वी १ जानेवारी या दिवशी जम्मूतील राजौरी येथे आतंकवाद्यांकडून हिंदूंना त्यांचे आधारकार्ड पाहून ठार मारल्याची घटना घडली होती.

संपादकीय भूमिका

इस्लामी देशांप्रमाणे जम्मू-काश्मीरमध्ये हिंदू असुरक्षित असणे, हे देशभरातील हिंदूंना लज्जास्पद !