सांगली – ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून हिंदु मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मांतर करणे, ‘हिंदु’ असल्याचे भासवून खोटे नाव सांगत मुलींची फसवणूक करणे, वेश्या व्यवसायात ढकलणे किंवा आखाती देशांत विकणे हे आणि यांहूनही भयानक प्रकार उघडकीस येत आहेत. हे अतिशय भयावह आहे. त्यामुळे अन्य राज्यांत झालेल्या कायद्याप्रमाणे महाराष्ट्रातही ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लवकरात लवकर होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा अन् गुजरात राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ते हरिदास भवन येथे २ जानेवारी या दिवशी झालेल्या मार्गदर्शनात बोलत होते. याचा लाभ १४० जिज्ञासूंनी घेतला.
या प्रसंगी भाजपचे ज्येष्ठ नेते श्री. श्रीकांत शिंदे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. संजय तांदळे, हिंदुत्वनिष्ठ श्री. कुंदन पवार, अधिवक्ता अमोघवर्ष खेमलापुरे, सिटी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक श्री. मधुकर खरे, श्री. बापट उपस्थित होते. या प्रसंगी ‘हिंदु राष्ट्र का हवे’, ‘हलाल जिहाद ?’, असे विविध ग्रंथ जिज्ञासूंनी विकत घेतले.
पलूस – श्री सिद्धेश्वर मंदिर येथे ‘लव्ह जिहाद’ आणि ‘हलाल जिहाद’ यांवर श्री. मनोज खाडये यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे सर्वश्री रोहित पाटील, पवन देसाई आणि अन्य धारकरी, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे श्री. सागर सुतार, भाजपचे श्री. सर्जेराव नलवडे, रा.स्व. संघाचे श्री. इंगळे यांसह १२५ जिज्ञासू उपस्थित होते.
याच समवेत भवानीनगर येथे सौ. विद्या सादुल यांनी, तसेच रेठरेहरणाक्ष येथे सौ. योजना पाटील यांनी ‘लव्ह जिहाद’ याविषयी मार्गदर्शन केले.