त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव यांच्या वडिलोपार्जित घराची माकप कार्यकर्त्यांकडून तोडफोड !

त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री विप्लव देव (डावीकडे)

गोमती (त्रिपुरा) – येथील उदयपूरमध्ये त्रिपुराचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे नेते विप्लव देव यांच्या वडिलोपार्जित घरावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमण करून तोडफोड करत आग लावली. या वेळी घरात कुणीही नव्हते. तसेच या वेळी कार्यकर्त्यांनी येथे दुकाने आणि काही वाहने यांचीही तोडफोड करून जाळपोळ केली.

विप्लव देव यांचे दिवंगत वडील हिरूधन देव यांच्या स्मरणार्थ वार्षिक श्राद्ध विधीचे आयोजन करण्यात येणार होते; मात्र त्याच्या एक दिवस आधी ही घटना घडली.

संपादकीय भूमिका

  • लोकशाहीच्या नावाखाली हिंसाचार करणारे असे गुंड कार्यकर्ते असणार्‍या माकपवर बंदीच घातली पाहिजे !
  • त्रिपुरामध्ये भाजपचे सरकार असतांना अशी घटना घडू नयेत, असेच हिंदूंना वाटते !