(म्हणे) ‘भाजप बाबरीनंतर ज्ञानवापी आणि ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे !’

माकपचे खासदार जॉन ब्रिट्स यांचा तथ्यहीन आरोप

माकपचे खासदार जॉन ब्रिट्स

कोळीकोड (केरळ) – भाजपने आधी बाबरी मशिदीला लक्ष्य केले आणि आता ज्ञानवापी मशीद आणि मथुरेतील ईदगाह मशीद यांना लक्ष्य करत आहे, असा तथ्यहीन आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि राज्यसभेतील खासदार जॉन ब्रिट्स यांनी येथे ‘नदवथुल मुजाहिदीन’च्या संमेलनात केला. तत्पूर्वी ब्रिट्स यांनी या संमेलनामध्ये भाजपचे नेते व्ही. मुरलीधरन् आणि गोव्याचे राज्यपाल अन् केरळ येथील भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष पी.एस् श्रीधरन् पिल्लई यांना आमंत्रित करण्यावरून अप्रसन्नता व्यक्त केली. त्यांनी ‘भाजप निवडणुकीत मते मिळवण्यासाठी धार्मिक सद्भावना आणि बंधूभाव यांची खोटी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे’, असा आरोप केला. ‘देशात २० टक्के लोकसंख्या असणार्‍या समाजला संसदेत योग्य प्रतिनिधीत्व दिले जात नाही’, असाही आरोप त्यांनी केला. (देशात लोकशाही आहे. संसदेत जाण्यासाठी निवडणुका घेतल्या जातात. जर या २० टक्के लोकसंख्यावाल्यांना संसदेत जायचे असेल, तर त्यांनी निवडूक लढवावी आणि जिंकून येऊन संसदेत जावे. संबंधितांना असे करता येत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा आरोप करणे, हा कांगावाच होय ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • अयोध्या, मथुरा आणि काशी येथे पूर्वी काय होते आणि नंतर तेथे कुणी काय बांधले, हे ब्रिट्स का सांगत नाहीत ?
  • साम्यवाद्यांनी भारताचा इतिहास नाकारला आणि जमेल त्या व्यासपिठावरून हिंदुद्वेष आणि अल्पसंख्यांकांचे लांगूलचालन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा प्रकारची वक्तव्ये करणे, हा साम्यवाद्यांचा वैचारिक आतंकवाद होय !