पुढील आठवड्यात कडाक्याच्या थंडीची शक्यता !

नवी देहली – सध्या देशात अनेक राज्यांत सर्वसाधारण थंडी पडली असली, तरी ३१ डिसेंबर ते ४ जानेवारी या ५ दिवसांत मात्र हंगामातील सर्वांत कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. देहली आणि राजस्थान येथे तर पारा १ अंश सेल्सियसपर्यंत पोचण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि पश्‍चिम उत्तरप्रदेशात रात्रीचे किमान तापमान १ ते ४ अंश सेल्सियस, तर कमाल तापमान १० ते १४ अंश सेल्सियस असू शकते. याखेरीज पंजाब, हरियाणा यांसह काही राज्यांत रात्रीचे तापमान नीचांकी होऊ शकते. उत्तरेकडील बहुतांश राज्यात दाट धुके असेल. दक्षिणेकडील राज्ये वगळता नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात देशभरात तापमानात घट नोंदवली जाईल.