पाकमध्ये १३ वर्षीय हिंदु मुलीचे घरातून अपहरण

कराची (पाकिस्तान) – अर्शद अली याने त्याच्या मित्राच्या साहाय्याने येथील शेरशहा भागातून एका १३ वर्षीय हिंदु मुलीचे काही दिवसांपूर्वी घरातून अपहरण केले. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंदवण्यात आला आहे, अशी माहिती ‘हिंदु ऑर्गनायझेशन ऑफ सिंध’चे संयोजक नारायण भील यांनी ट्वीट करून दिली.

संपादकीय भूमिका

पाकमधील असुरक्षित हिंदू !