उत्तरप्रदेशातील मुसलमान तरुणीने स्वीकारला हिंदु धर्म !

मुसलमान तरुणीने स्वीकारला हिंदु धर्म

मुझफ्फरनगर(उत्तरप्रदेश) – कसबा बागरा येथील योग साधना यशवीर आश्रमात शामली येथील गुल्फासा नावाच्या मुसलमान मुलीने नुकताच हिंदु धर्म स्वीकारला. ब्रह्मचारी स्वामी यशवीरजी महाराज यांनी सांगितले की, शामली येथील कैराना शहरातील अन्सारी (विणकर) जातीतील गुल्फासा अविवाहित आहे. या ३२ वर्षीय तरुणीने स्वतःच्या इच्छेनुसार हिंदु धर्म स्वीकारला आहे. ब्रह्मचारी मृगेंद्रने यांनी धार्मिक विधी करून तिला हिंदु धर्माची दीक्षा दिली. सुमारे दीडशे वर्षांपूर्वी तिच्या पूर्वजांनी हिंदु धर्म सोडून इस्लाम धर्म स्वीकारला होता.

ब्रह्मचारी स्वामी यशवीरजी महाराज यांनी सांगितले की, एका मुसलमान मुलीला हिंदु धर्मात समाविष्ट करून हिंदूंचे धर्मांतर रोखण्यासाठी स्वातंत्र्यपूर्व काळात चळवळ उभारणारे स्वामी श्रद्धानंद यांना श्रद्धांजली वहाण्यात आली आहे. गुल्फासा हिचे नाव हिंदु धर्मानुसार पूजा असे ठेवण्यात आले आहे. हिंदु धर्म स्वीकारलेल्या पूजाने सांगितले की, तिने स्वतःच्या इच्छेने हिंदु धर्म स्वीकारला आहे.