बांगलादेशात चर्चमध्ये कुराण ठेवणार्‍या मुसलमान तरुणाला अटक

ढाका – बांगलादेशातील राजशाही येथील एका चर्चमध्ये महंमद गोलाम चौधरी नावाच्या मुसलमान तरुणाने कुराण ठेवल्याचा आरोप आहे. चर्चमध्ये कुराण पाहिल्यानंतर तेथील लोकांनी पोलिसांना माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ‘सीसीटीव्ही’च्या आधारे चौधरी याला अटक केली, अशी माहिती ‘व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज’ या टि्वटर खात्यावरून देण्या आली.