हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांचा निश्‍चय !

नेदरलँड्स येथील खासदार गीर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – त्यांना (धर्मांधांना) माझे भारत, नूपुर शर्मा आणि हिंदुत्व यांच्याविषयीचे, तसेच भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार नाही, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतातील किती हिंदु खासदार हिंदूंवरील इस्लामी अत्याचारांविषयी बोलतात ? निष्क्रीय जन्महिंदूंपेक्षा गीर्ट विल्डर्स यांच्यासारखे ख्रिस्ती अधिक चांगले, असेच हिंदूंना वाटेल !