कोपरखैरणे येथे किरकोळ कारणावरून ३ पोलीस कर्मचार्‍यांना मारहाण !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी मुंबई – कोपरखैरणे येथे किरकोळ कारणावरून हॉटेलचालकाने ३ पोलिसांना मारहाण केली आहे. हे कर्मचारी कोपरखैरणेतील एका हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. त्या वेळी मटणाचा रस्सा चांगला नसल्याची तक्रार केल्याने हॉटेल कर्मचारी आणि पोलीस यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. हॉटेलमधील कर्मचार्‍यांनी शटर बंद करून पोलिसांना डांबून ठेवून मारहाण केली. यात पोलीस घायाळ झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यामध्ये हॉटेलमालक अक्षय जाधव आणि इतर तिघांवर गुन्हा नोंद केला असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका 

कायदा-सुव्यवस्था यांचा धाकच उरला नसल्याचे दर्शवणारी घटना !