‘ज्ञानम्’ महोत्सवात हिंदी भाषेतील ‘सनातन पंचांग’चे प्रकाशन !

सनातन पंचांग आणि अ‍ॅपचे प्रकाशन करतांना डावीकडून श्री. चेतन राजहंस, प्रवचनकार साध्वी प्रज्ञा भारती, श्री. ज्ञानदेव आहुजा, महंत दीपक वल्लभ गोस्वामी, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि श्री. आनंद जाखोटिया

जयपूर (राजस्थान), २० डिसेंबर (वार्ता.) – धर्मजागृतीच्या उद्देशाने प्रकाशित करण्यात आलेल्या ‘सनातन पंचांगा’च्या हिंदी भाषेतील आवृत्तीचे, तसेच हिंदी आवृत्तीच्या ‘अँड्रॉईड अ‍ॅप’ आणि ‘अ‍ॅपल अ‍ॅप’चे प्रकाशन जयपूर येथे आयोजित सुप्रसिद्ध ‘ज्ञानम्’ महोत्सवात करण्यात आले. प्रखर हिंदुत्वनिष्ठ तथा माजी आमदार श्री. ज्ञानदेव आहुजा यांच्या हस्ते हिंदी भाषेतील सनातन पंचांग, ‘ज्ञानम् फाऊंडेशन’चे अध्यक्ष महंत दीपक वल्लभ गोस्वामी यांच्या हस्ते हिंदी सनातन पंचांगचे ‘अँड्रॉईड अ‍ॅप’, तर देहली येथील सुप्रसिद्ध प्रवचनकार साध्वी प्रज्ञा भारती यांच्या हस्ते हिंदी सनातन पंचांगच्या ‘अ‍ॅपल अ‍ॅप’चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी व्यासपिठावर हिंदु जनजागृती समिती राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे आणि समितीचे राजस्थान समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांचीही उपस्थिती होती.

‘ज्ञानम्’ महोत्सवातील उपस्थित मान्यवर

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी केले. या वेळी त्यांनी उपस्थितांना ‘सनातन पंचांग’चा उद्देश सांगितला. उपस्थितांपैकी अनेकांनी कार्यक्रमस्थळीच स्वतःच्या भ्रमणभाषमध्ये हिंदी पंचांग ‘डाऊनलोड’ करून घेतले.