ग्रामपंचायत निवडणुकीच्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ६ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद !

बीड – राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठीचे मतदान चालू झाले आहे. कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ६ कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्याचे तहसीलदार आणि निवडणूक निर्णय अधिकारी दत्ता भारस्कर यांनी यासंदर्भात आदेश दिले आहेत. (कर्तव्यात कसूर करणार्‍या कर्मचार्‍यांवर गुन्हा नोंद करण्यासमवेतच त्यांना कठोर शिक्षा लवकर देणेही अपेक्षित आहे; जेणेकरून पुन्हा कुणी कर्तव्यात कसूर करणार नाही ! – संपादक)

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाकडून कर्मचार्‍यांना विविध दायित्व देण्यात आले आहे; मात्र नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांसह अन्य विभागांतील ६ कर्मचार्‍यांवर मतदान अधिकारी, केंद्राध्यक्ष म्हणून दिलेले दायित्व पार पाडण्यात हलगर्जीपणा केला असल्याचे समोर आले.