‘औरंगाबाद’ शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यास अनेक वर्षे मागणी होत रहाणे, हे प्रशासनाला लज्जास्पद !

प्रतिकात्मक छायाचित्र

‘महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने ‘औरंगाबाद’ शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ असे नामांतर करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. गेल्या अनेक वर्षांपासून नामांतराची मागणी होत आहे. आता या मागणीला लवकरच यश येणार असून ‘औरंगाबाद शहराचे नाव ‘छत्रपती संभाजीनगर’ करण्यास केंद्रीय गृह मंत्रालयाकडून लवकरच मान्यता मिळणार आहे’, अशी माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी ११ डिसेंबर २०२२ या दिवशी येथे दिली आहे.’ (१२.१२.२०२२)