(म्हणे) ‘हिंदू कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?’

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांचा हिंदुद्वेषी प्रश्‍न

एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – जर हिंदु कावड यात्रा काढून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?, असा प्रश्‍न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या वेळी मुरादाबाद येथे झालेल्या सभेच्या वेळेचा असल्याच सांगितले जात आहे.

शौकत अली पुढे म्हणाले की, कावड यात्रेमुळे १ मास राष्ट्रीय महामार्ग बंद होता आणि पोलीस अधिकारी कावड यात्रेकरूंचे पाय चेपून देत होते. आम्हाला यावर काहीही आक्षेप नाही; मात्र जेव्हा एखाद्या ‘मॉल’मध्ये (मोठ्या व्यापारी संकुलामध्ये) किंवा रस्त्यावर नमाजपठण केले जाते, तेव्हा आकांडतांडव केला जातो. काहींना तर आमच्या ‘अजान’मुळेही (नमाजपठणासाठी करण्यात येणारे आवाहन) त्रास होते. एका देशात दोन कायदे आहेत का ? (या देशात दोन कायदे आहेत, एक मुसलमानांसाठी आणि दुसरा हिंदूंसाठी ! जर मुसलमानांना हे नको असेल, तर त्यांनी समान नागरी कायद्याची मागणी केली पाहिजे ! नमाजपठणावरून शौकत अली यांना दोन कायदे दिसतात; मात्र अनेक बायका करण्याचे, मुले जन्माला घालण्याच्या, तलाकच्या वेळेला कायदे दिसत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक) जर हिंदु कावड यात्रा करून वाहतूक कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमाजपठण का करू शकत नाही ?

संपादकीय भूमिका

  • कावड यात्रेमुळे वाहतूक कोंडी होत नसतांना जाणीवपूर्वक असे विधान करून हिंदूंना दोषी ठरवण्याचा प्रयत्न शौकत अली करत आहेत. कावड यात्रा वर्षातून एकदाच होते, तर नमाज प्रतिदिन ५ वेळा होत असते, त्याविषयी ते बोलत नाहीत, हे लक्षात घ्या !
  • ‘ज्यांना रस्त्यावर नमाजपठण करायचे आहे त्यांनी इस्लामी देशांत जावे’, असे कुणी म्हटले, तर ते चुकीचे ठरू नये !