आज रत्नागिरी येथे हिंदु राष्ट्र -जागृती सभा !

श्रीक्षेत्र नाणीजधाम येथील प.पू. कानिफनाथ महाराज यांचे हिंदु राष्ट्र जागृती सभेला आशीर्वाद !

रत्नागिरी, २ डिसेंबर (वार्ता.) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शनिवार, ३ डिसेंबर २०२२ या दिवशी सायंकाळी ५ वाजता मारुति मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा होत आहे. २ डिसेंबर या दिवशी या सभेचे निमंत्रण श्रीक्षेत्र नाणीजधाम येथे स्वस्वरूप संप्रदायाचे उत्तराधिकारी प.पू. कानिफनाथ महाराज यांना देण्यात आले. या प्रसंगी प.पू. कानिफनाथ महाराज यांचा सत्कार सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केला. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री वसंत दळवी आणि संजय जोशी उपस्थित होते.

प.पू. कानिफनाथ महाराज यांचा सत्कार करतांना सनातनचे सद्गुरु सत्यवान कदम (डावीकडे)

या वेळी प.पू. महाराज म्हणाले, ‘‘हिंदूंचे राष्ट्र आणि धर्म यांसंबंधीचे प्रबोधन करणे, ही काळाची आवश्यकता आहे. त्यासाठी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती जे कार्य करत आहेत, ते खूपच चांगले आहे. माझे ३ डिसेंबर या दिवशी रत्नागिरी येथे होणार्‍या हिंदु राष्ट्र-जागृती सभेला आशीर्वाद आहेत.’’