एका सत्संगात दैवी बालिका कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ११ वर्षे) बोलत असतांना मला तिची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि तिच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. उच्च कोटीची शिकण्याची स्थिती
कु. प्रार्थना सतत शिकण्याच्या स्थितीत असते आणि तिची शिकण्याची स्थिती उच्च कोटीची आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. बोलण्यातील माधुर्य
‘तिचे बोलणे ऐकतच रहावे’, असे मला वाटत होते. ती इतरांना लगेच आपलेसे करते.
३. सात्त्विक आचरण
ती लहान असूनही तिची प्रत्येक कृती सात्त्विक आहे. परात्पर गुरुदेवांनी ‘प्रार्थनाचे वागणे, बोलणे आणि चालणे’ यांतून मला सात्त्विकता अनुभवायला दिली.
४. प्रार्थनामधील ‘सेवेचा ध्यास, त्याग, तळमळ आणि परात्पर गुरुदेवांप्रती (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या प्रती) शरणागतभाव अन् अपार कृतज्ञताभाव’, हे गुण मला अनुभवायला मिळाले.
५. चैतन्यमयी प्रार्थना !
तिच्याकडे पाहिल्यावर माझे मन एकाग्र होत होते. संतांकडे पाहिल्यावर चैतन्य मिळते, त्याप्रमाणे ‘प्रार्थना जणू चैतन्याची खाणच आहे’, असे मला जाणवले. ‘तिच्याकडे पहातच रहावे’, असे मला वाटत होते.
६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची महानता !
परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जगाला दैवी बालकांची ओळख करून दिली. ते मला दैवी बालकांकडून पुष्कळ काही शिकवत आहेत.
७. गुरुदेवांची रूपे असलेले दैवी बालके !
ही दैवी बालके गुरुदेवांचीच रूपे आहेत. ते एक एक रूप शक्ती, चैतन्य आणि आनंद प्रदान करत आहे. ‘दैवी बालकांतील गुरूंप्रती असलेला निरागस भाव, त्यांची हिंदु राष्ट्र आणण्याची आणि मोक्षाला जाण्याची तीव्र तळमळ पाहून माझ्यात तीळमात्रही तळमळ नाही’, याची मला जाणीव झाली. ‘माझी तळमळ वाढायला पाहिजे’, हे माझ्या लक्षात आले. हे गुरुदेवा, आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती अनिता भोसले, कराड, जिल्हा सातारा. (१७.६.२०२२)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |