इस्लामिक स्टेटचा प्रमुख अबू हसन अल् हाशिमी ठार

नवी देहली – इस्लामिक स्टेट या कट्टर जिहादी आतंकवादी संघटनेचा प्रमुख अबू हसन अल् हाशिमी ठार झाला असल्याची माहिती या संघटनेचा प्रवक्ता अबू उमर अल् मुहाजिर याने एका व्हिडिओद्वारे दिली. यात त्याने म्हटले आहे, ‘अबू हसन नुकत्याच एका लढाईत मारला गेला. आता संघटनेच्या प्रमुखपदी अबू अल् हुसेन अल् हुसैनी अल् कुरेशी याची नियुक्ती करण्यात आली आहे.’

मुहाजिर याने याविषयी अधिक तपशील दिला नाही. यापूर्वी फेब्रुवारीत सीरियात अमेरिकेच्या कारवाईत इस्लामिक स्टेटचा आधीचा प्रमुख अबू इब्राहिम ठार झाला होता आणि त्याच्या जागी अबू हसन प्रमुख बनला होता. ऑक्टोबर २०१९ मध्ये तत्कालीन प्रमुख अबू बक्र अल् बगदादी हाही ठार झाला होता.