बरेली (उत्तरप्रदेश) येथे २ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून केला हिंदु तरुणांशी विवाह !

एका तरुणीला कुटुंबियांकडून जिवाचे बरे-वाईट होण्याची भीती

प्रतिकात्मक छायाचित्र

बरेली (उत्तरप्रदेश) – येथे २ मुसलमान तरुणींनी हिंदु धर्म स्वीकारून हिंदु तरुणांशी विवाह केला. त्यांनी ‘हिंदु धर्मावर श्रद्धा असल्याने स्वच्छेने धर्मांतर केले’, असे म्हटले आहे. इरम झैदी हिचे विवाहानंतर स्वाती, तर शहनाज हिचे सुमनदेवी असे नाव ठेवण्यात आले आहे. शहनाज ही अजय बाबू नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने हिंदु धर्म स्वीकारून त्याच्याशी विवाह केला. बाहेरी येथील इरम झैदी हिने आदेश कुमार याच्याशी विवाह केला. पंडित के.के. शंखधर यांनी मदिनाथ येथील आश्रमात दोन्ही तरुणींचे लग्न लावून दिले.

 (सौजन्य : Daily Janmat News)

१. सुमनदेवी हिचा आरोप आहे की, तिचे कुटुंबीय तिच्या जिवाचे शत्रू बनले आहेत. तिच्यावर आणि तिच्या पतीसमवेत कोणतीही अनुचित घटना घडू शकते, अशीही तिला भीती आहे. जेव्हा तिच्या प्रेमाविषयी तिच्या कुटुंबियांना समजले, तेव्हा त्यांनी तिला मारहाण करत ठार मारण्याचा प्रयत्न केला होता.

२. अजय बाबूने सांगितले की, सुमनच्या कुटुबियांच्या धोक्यामुळे आम्ही पोलिसांकडे संरक्षण देण्याची मागणी केली आहे.