ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या संख्येत घट, तर मुसलमानांची वाढ !

प्रातिनिधिक छायाचित्र

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या वेगाने अल्प होत आणि मुसलमानांची लोकसंख्या वाढत आहे. लोकसंख्येची आकडेवारी समोर आल्यानंतर हे दिसून आले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथे ख्रिस्त्यांची लोकसंख्या ५० टक्क्यांहून अल्प झाली आहे. या प्रकरणी यॉर्कचे आर्चबिशप (वरच्या श्रेणीतील पाद्य्रांना दिलेले पद) स्टीफन कोट्रेल यांनी म्हटले की, हे आश्‍चर्यजनक आहे की, ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत जलद गतीने घट होत आहे.

‘ऑफिस फॉर नॅशनल स्टॅटिस्टिक्स’च्या आकडेवारीनुसार ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांच्या लोकसंख्येत १३.१ टक्क्यांनी घट झाली आहे, तर मुसलमानांची लोकसंख्या ४.९ टक्क्यांनी वाढून ती ६.५ टक्के (३९ लाख) झाली आहे. ब्रिटनमध्ये ख्रिस्त्यांची लोकसंख्या ४६.२ इतकी आहे. त्यानंतर कोणताही धर्म न मानणार्‍या लोकांची टक्केवारी ३७.२ (२. कोटी २२ लाख) इतकी आहे. हिंदूंची लोकसंख्या १० लाख आहे, तर शिखांची संख्या ५ लाख २४ सहस्र इतकी आहे.

संपादकीय भूमिका

ब्रिटनमध्येही ‘लोकसंख्या जिहाद’ करण्यात येत आहे, असे कुणी म्हटल्यास ते चुकीचे कसे ठरील ?